Maan : आमदार गोरेंना शरण येण्याचे आदेश; अटकेपासून दिलासा कायम....

ऍट्रॉसिटीचा गुन्हा crime of atrocity अजामीनपात्र Non Bailable असल्याने वडूज Vaduj येथील जिल्हा सत्र न्यायालय व सातारा Satara जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama

मुंबई : मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा भाजपचे माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी आमदार गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना चार आठवडे अटकेपासून दिलासाही दिला आहे.

MLA Jaykumar Gore
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयाचा दणका

मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिलेली आहे.

MLA Jaykumar Gore
मला अडकविण्यात राष्ट्रवादीचेच षडयंत्र; जशास तसे उत्तर देणार...जयकुमार गोरे

ऍट्रॉसिटीचा गुन्हा अजामीनपात्र असल्याने वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालय व सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मग त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला होता. पण त्यांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता.

MLA Jaykumar Gore
रामराजेंनीच माण तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं...जयकुमार गोरे

यावर गोरंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन आमदार गोरेंना सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चार आठवडे अटक न करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे आमदार गोरेंना दिलासा कायम राहिला आहे. आता वडुज न्यायालयात या दिलेल्या वेळेत जामीन घेण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे, अशी माहिती आमदार गोरेंचे वकिल अरूण खोत यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com