तिहार जेलमधील AAP नेत्याचा VIDEO व्हायरल ; ईडीची तक्रार खरी ठरली ?

Satyendra jain latest news : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा डाव आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले.
Satyendra jain latest news
Satyendra jain latest newssarkarnama

Satyendra jain : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या कॅबिनेट मंत्र्याचा तिहार जेलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारण रंगले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने आम आदमी पक्षाला कोडींत पकडले आहे. तर दुसरीकडे आपने हे आरोप फेटाळून लावत भाजपवर पलटवार केला आहे.

आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिहार जेलमधील हा वैद्यकीय उपाय असल्याचे सिसोदिया यांनी म्हटलं आहे. हे भाजपचे कटकारस्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

आपचे नेता, कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या तिहार जेलमध्ये आहेत त्यांचा जेलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात जैन एका बेडवर झोपलेले असून त्यांची मसाज करताना एक व्यक्ती दिसून येत आहे. या संबंधीचे तीन व्हिडिओ सध्या व्हायरल झालेले आहेत. यावरून भाजप आक्रमक झाला आहे.

Satyendra jain latest news
Narayan Rane : सावरकरांना बाळासाहेब का मानत होते ? हे आदित्य अन् उद्धव ठाकरेंना माहित नाही..

जैन हे जेलमध्ये पडले होते, त्यांच्या पाठीला दुखापत झाल्याने त्यांच्यावर फिजियोथेरपी सुरु आहे. त्यांची दोन वेळा शस्त्रक्रिया देखील झाली आहे. डॅाक्टरांनी त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर ते फिजियोथेरपी घेत आहे.या व्हिडिओ ते फिजियोथेरपी घेत असल्याचे दिसत आहेत, असे सिसोदिया यांनी सांगितले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

वैद्यकीय उपचारांचा व्हिडिओ-मनीष सिसोदिया

जैन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यांचा वैद्यकीय उपचारांचा व्हिडिओ व्हायरल करुन भाजपने त्यांची खिल्ली उडवली आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा डाव आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले.

तुरुंगात सुविधा ?

सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात अनेक सुविधा मिळत असल्याचे ईडीने म्हटले होते. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पाठ आणि पायाची मालिश करताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन एका कॉटवर झोपलेले आहे. तसेच काहीतरी कागदपत्रांचे वाचण करित आहेत. यावेळी एक व्यक्ती त्यांचे पायाला मसाज करत आहे. तर जैन यांनी त्यांचा पाय त्या व्यक्तीच्या हातावर ठेऊन मसाज करून घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in