J. K. Rowling : घाबरू नका, यानंतर तुमचाच नंबर, रश्दींच्या हल्लानंतर 'हॅरी पॉटर'च्या लेखिका जे के रोलिंग यांना धमकी

J. K. Rowling : रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर आता जे के रोलिंग यांना धमकीचा संदेश मिळाल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.
J. K. Rowling
J. K. Rowling Sarkarnama

नवी दिल्ली : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आणखी एका लेखिकेला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. रश्दी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी ट्वीट केले होते. जे के रोलिंग यांनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे ट्वीट केले होते. तसेच रश्दी लवकरच बरे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

57 वर्षीय लेखिका जेके रोलिंग यांनी धमकी देणाऱ्या या संदेशाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. जे के रोलिंग हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आहेत. रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर आता जे के रोलिंग यांना धमकीचा संदेश मिळाल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

J. K. Rowling
Vinayak Mete : १५ ऑगस्टनंतर आम्ही भेटणार होतो, आता ती भेट होणार नाही ; पंकजा मुंडे भावुक

जे के रोलिंग यांनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे ट्वीट केले होते. तसेच रश्दी लवकरच बरे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याच ट्वीटला उत्तर म्हणून एका ट्विटर वापरकर्त्याने घाबरू नका यानंतर तुमचाच नंबर आहे, असे ट्वीट केले. ज्या ट्विटर खात्यावरून रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, त्याच खात्यावरून रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हादी मातर या हल्लेखोराचे कौतुक करण्यात आलेले आहे.

दोन दिवसापूर्वा प्रसिद्ध कादंबरीकार सलमान रश्दी (salman rushdie) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशन येथील एका कार्यक्रमात बोलत होते. रश्दी हे बोलत असताना हल्लेखोर अचानक त्यांच्या दिशेने धावत गेला. त्याने रश्दींवर चाकूने हल्ला केला.

'द सॅटेनिक व्हर्सेस' पुस्तकानंतर रश्दींना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. सलमान रश्दी हे बुकर पुरस्कार विजेते लखक आहेत. त्यांच्या लिखानामुळे अनेकदा वादातही राहिले आहेत. रश्दींची ओळख करून देत असताना त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यानंतर रश्दी हे जमीनीवर कोसळले. रश्दी यांच्या उपचार सुरु असून सध्या त्यांची तब्येत चिंताजनक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com