Sushma Andhare News : "मला नरडं तर त्यांना गळा, अमृता वहिनींची मराठी ऐकून कानात शिसं ओतल्यासारखं.."; अंधारेंनी डिवचलं !

Sushma Andhare on Amruta Fadnavis : "कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली.."
Sushma Andhare on Amruta Fadnavis :
Sushma Andhare on Amruta Fadnavis : Sarkarnama

Sushma Andhare on Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल झालेल्या मुलाखतीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले होते. सुषमा अंधारे या मला माझ्यासारख्याच वाटायच्या, असं वक्तव्य त्यांनी केले होते. आता यावरून अंधारे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा समाचार घेतला आहे.

Sushma Andhare on Amruta Fadnavis :
Ashok Chavan Thanaks To Nitin Gadkari : अशोक चव्हाण यांनी मानले गडकरींचे आभार..

सुषमा अंधारेंच्या,"अमृता वहिनींना मी त्यांच्यासारखे वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं? कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये?" असा प्रश्न त्यांनी केला आहे.

पुढे त्यांनी लिहीलं की, "पण, मग मला कधीतरी वाटलं की, कदाचित भाषा प्रभुत्व हे एक दोघीतलं साम्य असेल का? पण छे! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असू शकत नाही," असं अंधारे पोस्टमधून खोचक वार केला आहे.

Sushma Andhare on Amruta Fadnavis :
Ajit Pawar News : 'अजित पवार मुख्यमंत्री होणारच..'; अमित शाहांचा संदर्भ देत राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा !

राज ठाकरेंवर ही निशाणा -

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. मराठी भाषेचे पाईक असा उल्लेख करत त्यांनी राज ठाकरेंवर लक्ष्य केले. अमृता फडणवीस यांची मस्त मराठी ऐकून त्यांना देखील कानात शिसे ओतल्यासारखं वाटलं असेल, असेही अंधारे म्हणाल्या.

अंधारेंनी लिहलं की, "पण त्या ही पेक्षा मराठी मनाचे मानबिंदू असणारे,मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवा चा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुद्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकून कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com