राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांना ज्योतिषाकडे नेले; चर्चांना उधाण

CM Eknath Shinde : राष्ट्रवादीचे नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
CM Eknath Shinde Latest News
CM Eknath Shinde Latest Newssarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता.२३ नोव्हेंबर) शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सिन्नर येथे एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यी शिंदेंवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिंदेंवर निशाणा साधला आहे. (CM Eknath Shinde Latest News)

CM Eknath Shinde Latest News
Atul Sawe : सहकारक्षेत्रातील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडण्याचा भाजपचा डाव

मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) ज्योतिष्याकडे नेण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांनीच राजी केल्याचे समजते. विशेष म्हणजे या सर्व नियोजनात राष्ट्रवादीचा एक बडा नेता असल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या सिन्नर येथील श्री शिवनिका संस्थानच्या विश्वस्थ आहेत, हे विशेष. त्यामुळे याप्रकरणची जास्तच चर्चा होत आहे.

CM Eknath Shinde Latest News
भाजपमध्ये अंतर्गत वाद? : 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् शेलारांमध्ये बेबनाव!'

मुख्यमंत्री शिंदेंनी ज्योतिषाची भेट घेतल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.यामध्ये संजय राऊतांनी तर 'सध्याचं सरकार हे देवधर्म, ज्योतिष यांच्यात अडकलं आहे,असे म्हणतं शिंदेंना डिवचलं. तर पवारांनी यावर बोलतांना माझा ज्योतिषावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही.महाराष्ट्रात सध्या या गोष्टी नव्याने पाहायला मिळत आहे.याआधी असं कधी होत नव्हतं, असा चिमटा मुख्यमंत्र्यांना काढला.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांना ज्योतिषाकडे जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोणत्या बड्या नेत्याने सहकार्य केलं यावरून पक्षातील नेत्यांकडून एकमेकांकडे बोट दाखवलं जात आहे. तर ज्योतिषी गाठण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याच्या चर्चाही रंगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com