कॉंग्रेसशी युती करण्यासाठी राऊतांनी ठाकरेंना...; रवी राणांचां गंभीर आरोप

Sanjay Raut| Ravi Rana| खासदार संजय राऊत यांना तेरा तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली
Ravi Rana Latest Marathi News
Ravi Rana Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तेरा तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. रविवारी (३१ जुलै) सकाळी ईडीच्या पथकाने राऊतांच्या घरी छापेमारी केली. त्यानंतर दुपारी ईडीने (ED Action) त्यांना ताब्यातही घेतले. रविवारी सकाळपासून सुरु असलेल्या या नाट्यमय घडामोडींमध्ये ईडीने राऊत यांच्यावर सोमवारी रात्री अटक केली.

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे. अनेकदा संजय राऊत यांना देखील जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. संजय राऊत यांनी अनेक भ्रष्टाचार केलेत. त्याचे धागेदोरे सुद्धा मोठे आहेत आणि ते अनिल परबपर्यंत सुद्धा पोहोचतील. त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. याशिवाय महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्याची मोठी जबाबदारी संजय राऊतांवर होती. उद्धव ठाकरेंना भाजपमधुन बाहेर काढून काँग्रेसमध्ये युती झाली आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. यामागे सुद्धा संजय राऊत होते. अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

Ravi Rana Latest Marathi News
Sanjay Raut : ईडीने जप्त केलेली रोकड अयोध्या दौऱ्यासाठी ; एकनाथ शिंदेंचेही नाव

काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

राऊत यांना त्यांच्या घरातून ईडी कार्यालयात नेत असताना शिवसैनिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राऊत म्हणाले होते, जी काय कारवाई व्हायची आहे ती होऊ द्या, मी घाबरत नाही. राजकीय सुडाने हे सगळे चालले आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांचे बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो. हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही, असेही ते म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in