Sharad Pawar News : तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती; पण...: शरद पवार राजीनाम्यावर दोन दिवसांनंतर बोलले

माझ्या अध्यक्षपद सोडण्याच्या निणर्यावर तुम्हा सर्व सहकाऱ्यांच्या तीव्र भावना आहेत, हे तुमच्या रुपाने व्यक्त हेात आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेताना सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता होती. मात्र, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधीही होय म्हटला नसता. पण, तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती, त्यावेळी माझ्याकडून ती घेतली गेली नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. (It was necessary to take decisions by taking your colleagues into confidence: Sharad Pawar)

‘लोक माझे सांगाती’ या सुधारीत पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहोत, असे सांगितले होते. त्यावेळी सभागृहात एकच गोंधळ उडाला होता. सर्व नेते, आमदार, खासदार, कार्यकर्ते अक्षरशः रडत होते. पवारांनी आपली घोषणा मागे घ्यावी, अशी विनंती सर्वजण करत होते. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम होते. मात्र, दोन दिवसांनंतर पवार राजीनाम्यावर जाहीरपणे बोलले.

Sharad Pawar
Solapur DCC Bank Election : भाजप आमदारांच्या आग्रहामुळे सोलापूर डीसीसीच्या प्रशासकाला मुदतवाढ

पवार म्हणाले की, माझ्या अध्यक्षपद सोडण्याच्या निणर्यावर तुम्हा सर्व सहकाऱ्यांच्या तीव्र भावना आहेत, हे तुमच्या रुपाने व्यक्त हेात आहे. मंगळवार, बुधवारी आणि आजही ती दिसून आली आहे. तुम्ही माझे सर्व सहकारी फक्त मुंबईतूनच आला आहात, असे नाही, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले आहात. मी पक्षाच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar's Pandharpur Tour : अभिजित पाटील शरद पवारांना भेटले अन॒ पंढरपूरचा दौरा फिक्स करून आले

उद्या पक्षाचे काम कसे चालावे आणि आम्ही लोक भक्कमपणे त्यांच्या मागं आहोत, त्यामधून नवे नेतृत्व शक्तीशाली करावं, हा त्या माझ्या निर्णयापाठीमागचा हेतू होता. ही गोष्ट खरी आहे की असे निर्णय घेताना सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता असते. मी तसा विचारही केला. मात्र, मला खात्री होती की, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधीही होय म्हटला नसता. पण, तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती. त्यावेळी माझ्याकडून ती घेतली गेली नाही, हे मात्र खरे आहे, अशी कबुलीही शरद पवार यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com