अबु आझमींच्या निकटवर्तींयांसह आयटी'ची देशभरात तीसहून अधिक ठिकाणांवर छापेमारी

Abu Aazmi | अबू आझमी हे महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांचे निकटवर्तीय आभा गणेश गुप्ता यांच्या घरावर आयकर विभागाने (IT) छापे टाकल्याची बातमी समोर आली आहे. हे छापे बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशाशी संबंधित आरोपांशी संबंधित हे छापे टाकण्यात आले आहेत.

आयटीने मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊमध्ये ३० हून अधिक ठिकाणी हे छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. अबू आझमी हे महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर आभा गुप्ता या गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत, जे अबू आझमीचे निकटवर्तीय आणि सपाचे सरचिटणीस होते. गणेश गुप्ता यांचे निधन झाले आहे. आभा गुप्ता यांच्या कंपन्यांच्या जागेवरही हे छापे टाकण्यात आले आहेत.

Abu Azmi
जामीन मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची दोनच शब्दांत प्रतिक्रिया...

कुलाब्यातील कमल मॅन्शनवरही आयटीने छापा टाकला आहे. आभा गुप्ता आणि अबू आझमी यांचे कार्यालय येथे आहे. याशिवाय मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ येथे छापे टाकण्यात आले आहेत. वाराणसीतील विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या आवारात छापा टाकण्यात आला. आभा गुप्ता यांनी कंपनीत मोठी बेनामी गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुपही आयटीच्या रडारवर आहे. आयटीने कोलकाता येथील हवाला व्यापाऱ्यांवर छापे टाकले आहेत.

त्याचवेळी आयकराने एसएनके पान मसाला बनवणाऱ्या कुरेले ग्रुप कानपूरवरही छापा टाकला आहे. दिल्लीतील कुरेले ग्रुपच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या जागेवरही छापे टाकण्यात आले आहेत. छाप्यादरम्यान आयटी पथक कुरेळे ग्रुपची सर्व कागदपत्रे तपासत आहे.

Abu Azmi
Satara : उरमोडीच्या पाण्यापासून शेतकरी वंचित; शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली ही भूमिका...

आयकर विभागाचा हा छापा बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात आयटी पथक मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ याठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाराणसीतील विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या परिसरात आयकर विभागाने छापा टाकला आहे.

आरोपानुसार, आभा गुप्ता यांनी कंपनीत मोठी बेनामी गुंतवणूक केली आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुपही आयकराच्या टार्गेटवर आहे. त्याचबरोबर कोलकात्यात हवाला व्यापाऱ्यांच्या ठिकाणांवर आयटीने छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथे छापे टाकताना हवालासाठी एंट्री ऑपरेटरचा वापर केला जात होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com