ओबीसींची संख्या कमी दाखवणे हे एक षडयंत्र...

OBC Reservation|Vijay Vadettiwar : ओबीसींची संख्या कमी कशी झाली,असा सवाल माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
 Vijay Vadettiwar Latest News
Vijay Vadettiwar Latest NewsSarkarnama

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) नेमण्यात आलेल्या 'बांठिया आयोगाने' राज्यात ओबीसींची संख्या ३८ टक्के दाखवली. मात्र, इतकी कमी संख्या असूच शकत नाही. ओबीसींची संख्या कमी दाखवणे हा षडयंत्राचा भाग आहे, असा आरोप माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला. (Vijay Vadettiwar Latest Marathi News)

 Vijay Vadettiwar Latest News
मोठी बातमी; राज्यातील 92 नगरपरिषदा अन् 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

बांठिया आयोगाने अहवालात राज्यातील ओबीसींची संख्या ३८ टक्के असल्याचे म्हटले आहे, पण प्रत्यक्षात ही संख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही, असा दावा वडेट्टीवारांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण काढून घेण्यासाठी त्यांची संख्या कमी दाखवणे हा षडयंत्राचा भाग आहे. ओबीसींना आरक्षण देताना २८० जातींचा समावेश करण्यात आला होता. आता यामध्ये आणखी १०० जातींचा समावेश करण्यात आल्याने हा आकडा ३८० वर गेला आहे. असे असताना ओबीसींची संख्या कमी कशी झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बांठिया आयोगावर आक्षेप

  • आडनावावरून जाती ठरवणे अयोग्य

  • केवळ १८ वर्षांवरील लोकांचीच माहिती घेतली

  • १८ वर्षांखालील सर्वांची माहिती घेतली असती तर आकडेवारी निश्चितच वेगळी दिसली असती

  • अनुसूचित जाती आणि जमातींप्रमाणे ओबीसींची जातनिहाय जनगणना केली पाहिजे

  • याबाबतच्या सूचना बांठिया आयोगाने स्वीकारल्या नाहीत.

 Vijay Vadettiwar Latest News
नगरसेवक, जिल्हाप्रमुख ते थेट 'मातोश्री'ला आव्हान देणारे आमदार संतोष बांगर...

बांठिया आयोगाने सादर केलेला अहवाल राज्य सरकारने त्वरित फेटाळावा. या चुका दुरुस्त करून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. तसे न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in