शिल्लक सेनेच्या दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?

MNS|Shivsena : शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे व राज ठाकरे दिसू लागले आहेत.
Gajanan Kale, Uddhav Thackeray, Owiasi Latest News
Gajanan Kale, Uddhav Thackeray, Owiasi Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेनेतील (Shivsena) वाद वाढतच जातांना दिसत आहे. आधी ४० आमदार त्यानंतर १२ खासदारांना शिंदेंनी गळाला लावल्याने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा परंपरागत असलेला दसरा मेळावाही हायजॅक करण्याची तयारी आहे. यामुळे हा वाद आता आणखीच वाढण्याची चिन्ही आहेत.

दरम्यान आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.आता या मेळाव्यावरून मनसेनेही उडी घेतली आहे. मात्र, शिवसेना शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यावर यावर ठाम आहे. यावरून शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरे का?, असा खोचक सवाल मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केला आहे. यामुळे शिवसेना, मनसे (MNS) असा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Gajanan Kale, Uddhav Thackeray, Owiasi Latest News)

Gajanan Kale, Uddhav Thackeray, Owiasi Latest News
..तर 'त्या' आमदारांची नियुक्ती निवडणुकीनंतर करा...

काळे यांनी आपल्या ट्विटवर मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले की, माजी महापौर ताई पुन्हा बरळल्या शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे व राजसाहेब दिसू लागले आहेत. आता यांच्या शिल्लक सेनेच्या पक्षप्रमुखांनी अबू आझमीच्या समाजवादी पक्षाशी युती केली तरी महाराष्ट्राला नवल वाटणार नाही. शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का ?, अशा शब्दात काळे यांनी टीका केली आहे.

आगामी मुंबई पालिकेत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार असून, १५० जागांवर उमेदवार निवडून येतील,असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आणि मनसेवर निशाणा साधला होता. तर राज ठाकरे हे उद्या कोणाच्याही व्यासपीठावर दिसतील. याबाबत नवखे असे काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यामुळे त्यांच्या पक्षाला कोणती विचारधाराच राहिलेली नाही हेच स्पष्ट होते. असे पेडणेकर म्हणाल्या. यावप काळे यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Gajanan Kale, Uddhav Thackeray, Owiasi Latest News
दसरा मेळावा : पंकजा मुंडेसारखी वेळ उद्धव ठाकरेंवर येणार का?

दरम्यान, शिवतीर्थावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप नेते भेटून काय गेले शिल्लक सेनेच्या शिल्लक नेत्यांच्या बुडाला खूपच आग लागली, असे दिसतेय. यांनी सगळे गुंडाळून असंगाशी संग केलेला चालतो. बाळासाहेबांचे विचार गुंडाळून राष्ट्रवादीची लाचारी चालते आणि विचार, निष्ठा, हिंदुत्वची प्रवचन मनसेला देणार, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. तर हिंदुत्व, मराठीला बगल देवून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणे, विधानपरिषदेला अंबादास दानवे एमआय आमदारांच्या जीवावर निवडून आणणे आणि राज्यसभेला त्यांची मदत घेणे. याला लाचारी म्हणतात ताई. डोक्यात कांदे भरून इच्छा आकांक्षा, मनिषा पूर्ण करायचे उद्योग तुमच्या शिल्लक सेनाप्रमुखांनी केले आहेत, अशा शब्दांत काळेंनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com