
Jitendra Awhad News : सुषमा अंधारे यांच्याविरोधात शिंदे गटाकडून ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली होती. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांवर संतापले आहेत. पोलिसांना हाताशी धरून हा बंद करण्यात आला असा आरोप करत हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, असं माध्यमांशी बोलताना आव्हाडांनी संताप व्यक्त केला.
''महाविकास आघाडीचा महामोर्चा शनिवारी मुंबईत निघाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था, वाहतूककोंडी होणार नाही, यासाठी पोलिसांना सूचना देणे गरजेच्या होत्या. मात्र मुंबईतील महामोर्चा दडपण्यासाठीच हा बंद घडवून आणला. ते मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय आहेत?'' असा सवाल करत आव्हाडांनी त्यांना टोला लगावला.
''मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण होते, आणि आता बस बंद केल्या जात असतील तर ही दडपशाही आहे. महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी या सर्वांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चाचा काढण्यात आला होता'', असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ठाण्यातून हजारो लोकं महामोर्चात सहभागी झाले होते. सरकारमधील नेतेमंडळी महापुरुषांबद्दल करत असलेले अवमानजनक वक्तव्य या सर्वांच्या विरोधात आघाडीचा महामोर्चा होता, पण यावेळी ठाण्यात बंद पुकारून परिवहन सेवा बंद ठेवून, रिक्षाचालकांना दमदाटी करून नागरिकांना वेठीस धरण्यात आले होते, असा आरोप आव्हाडांनी केला आहे.
दरम्यान, ठाण्यात वारकऱ्यांसाठी बंद केला. ''पण खुद्द वारकरी हे आमच्यासोबत आहेत'', असं म्हणत ''आम्हीही वारकरी आहोत. पिढ्यानपिढ्या वारकरी परंपरा जपत आहोत'' असं म्हणत यावेळी आव्हाड यांनी वारकऱ्यांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे धन्यवाद मानले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.