किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर डावलले; इकबाल सिंह चहल ठरले हिरो

Kishori Pednekar | Shivsena | : निमित्त मुंबई महापालिकेच्या कौतुक सोहळ्याचे
किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर डावलले; इकबाल सिंह चहल ठरले हिरो

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर शिवसेनेला फायदेशीर ठरण्याची शक्यता असलेले एक पुस्तक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकातून एक प्रकारे कोरोना काळात जगभर प्रसिद्ध झालेल्या मुंबई पॅटर्नच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे. मात्र याच शाही 'इव्हेंट'ला महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांना डावलल्याचे दिसून आले. इतकंच काय तर उपमहापौर, सभागृह नेते आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनाही चहल आणि प्रशासनाने मान दिला नसल्याचे सोमवारी दिसून आले. (BMC Election latest news)

मुंबई महापालिकेने कोरोना काळात आयुक्त म्हणून केलेल्या उपाययोजनांच्या आढाव्याचा भाग म्हणून "इकबाल सिंह चहल - कोविड वॉरियर" या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला व्यासपीठावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. मात्र, व्यासपूठावर आणि पुढच्या गर्दीत पेडणेकर यांच्यासह अन्य कोणीही पदाधिकारी नव्हते. या मंडळींना चहल यांनी बोलावले नसल्याचेच सांगण्यात येत आहे.

किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर डावलले; इकबाल सिंह चहल ठरले हिरो
"राष्ट्रवादीची भूमिका कायमच भाजपच्या बाजूने" : पटोलेंनी हायकमांडकडे केली पवारांची तक्रार

जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना संसर्गाच्या साथीत भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेवर आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्यावरून पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अडचणीत आणण्याची संधी भाजपकडून दिवसागणिक साधली जात आहेत. अशातच या काळात चोख कामगिरी बजाविल्याचे सांगून सत्ताधारी शिवसेना आपली पाठ थोपटून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यात आयुक्त आणि आताचे प्रशासक म्हणून चहलही मागे राहिले नाहीत. मात्र, या काळात चहल यांनी लप्रशासनाच्या मोहिमांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना गौरव सोहळ्यात डावलून, मुख्यमंत्री ठाकरे यांची शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न चहल यांनी केल्याचे स्पष्ट आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विशेषत: ऐन कोरोनातही मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील संघर्ष झडत राहिला. या काळातील घोटाळ्यांपासून रुग्णांचे हाल झाल्याच्या मुद्यांवरून या दोघांत आरोप-प्रत्यारोप झडत राहिले. तरीही महापौर म्हणून पेडणेकर आणि त्यांचे काही सहकारी भाजपला सडेतोड उत्तरे देत पुरुन उरले. कोरोनाच नव्हे तर शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील आरोप त्याच भाषेत उत्तरे देण्यासाठी पेडणेकर या नेहमीच आघाडीवर राहिल्या.

किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर डावलले; इकबाल सिंह चहल ठरले हिरो
भाजप प्रवक्ते आंबेकरांना मारहाण करणं भोवलं; राष्ट्रवादीच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मात्र, पेडणेकर यांच्याच काळात झालेल्या उजव्या कामगिरीचे कौतुक होत असतानाच चहल यांनी त्यांना लांब ठेवल्याने नव्या चर्चाना वाव मिळाला आहे. मुळात पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चहल यांनी निमंत्रण दिले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने कोरोना काळातील महापालिकेची कामगिरी शिवसेनेसाठी महत्त्वाची असतानाही ठाकरे यांनाही पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आठवण का झाली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com