गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ATS कडे द्या; कुटुंबीयांकडून उच्च न्यायालयात अर्ज

Govind Pansare|ATS : गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरात 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या
Govind Pansare Latest News, Govind Pansare case news updates
Govind Pansare Latest News, Govind Pansare case news updatesSarkarnama

Govind Pansare: भाकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास हा दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) द्यावा यासाठीचा विनंती अर्ज पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) केला आहे. न्यायालयाने याबाबत राज्य सरकारचे म्हणणे काय आहे ते मांडण्याचे निर्देश दिले आहे. (Govind Pansare Latest Marathi News)

Govind Pansare Latest News, Govind Pansare case news updates
अखेर नाराजी दुर! फडणवीसांनी आग्रहाने शिंदेंना मुख्यमंत्र्यांंच्या खुर्चीत बसवले...

गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरात 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडल्या होत्या. 20 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी बाहेर फिरायला गेले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला आता सात वर्षे पूर्ण झाली असून आद्यापही याबाबतचा तपास लागलेला नाही.

न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि न्यायमूर्ती व्हीजी बिष्ट यांच्या पीठापुढे हा अर्ज करण्यात आला आहे. नरेंद्र दाभोलकर, एम.एम.कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येमागे मोठा कट असल्याने याचा तपास योग्यप्रकारे होणे गरजेचे असल्याचे पानसरेंच्या वकिलांनी अर्जात म्हटले आहे.

Govind Pansare Latest News, Govind Pansare case news updates
पाच कोटींसाठी विश्वासू साथीदारानेच केला चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक खुलासा

दरम्यान, दाभोलकर प्रकरणाचा तपास सुरू असल्याने दुसऱ्या तपास यंत्रणेकडे देणे अशक्य आहे. मात्र, पानसरेंच्या हत्येचा तपास एटीएसकडे (ATS) देणे शक्य असल्याचे विनंती अर्जात पानसरेंच्या वकिलांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी बदलीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. यावर न्यायालयाने 4 आठवड्यात नव्या तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले असून आता तपासणी करत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करता येईल, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in