Eknath Shinde-Jitendra Awhad
Eknath Shinde-Jitendra AwhadSarkarnama

International Men’s Day : ..तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष ! ; आव्हाडांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

International Men’s Day : काबाडकष्ट करत मुलाबाळांना घडवतो तो..स्वतः उपाशी राहत इतरांना भरवतो तो..

International Men’s Day : विनयभंगाच्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर केला आहे. गेल्या रविवारी भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली होती.

या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसानिमित्त आव्हाडांनी केलेलं टि्वट लक्ष वेधून घेणारं आहे. या टि्वटच्या माध्यमातून आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Eknath Shinde-Jitendra Awhad
Shiv Sena : भाजपच्या नागोबांना बिळाबाहेर पडण्याची संधी राहुल गांधी वारंवार का देतात ?

जामीन मिळाल्यानंतर आव्हाडांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. मला अडकविण्यासाठी हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी केला होता. "एखाद्या महिलेला पुढे करून राजकारण केले जात आहे. राज्यात यापूर्वी कधीच पाहिले नव्हते, हे अत्यंत वाईट आहे," असेही आव्हाड म्हणाले होते.

"गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष," असे टि्वट करीत आव्हाडांनी आज पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

आपल्या टि्वटमध्ये आव्हाड म्हणातात, " काबाडकष्ट करत मुलाबाळांना घडवतो तो..स्वतः उपाशी राहत इतरांना भरवतो तो.. हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो..हलाखीचे दिवस काढत इतरांचे स्वप्न पूर्ण करतो तो.. आणि गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष,"

"मुंब्रा आणि कळवा पूल बांधून तयार होता. पुलांच्या बांधकामाचा पाठपुरावा करून घेण्यात माझा मोठा सहभाग होता. या पुलाचे लोकार्पण करण्यास सर्व जण मला सांगत होते. मी त्या पुलाचे लोकार्पण करू शकलो असतो, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तो सन्मान दिला पाहिजे, असे माझ्या मनात होते. इतके चांगले वागूनही राजकारण केले जाते," असेही आव्हाड म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com