'हनुमान चालीसा' म्हणण्याऐवजी 'विकासाची संजीवनी' लोकांपर्यंत पोचवा...महेश तपासे

राज्यातील Maharshtra सरकार Government अस्थिर कसं होईल, धार्मिक व जातीय तेढ Religious and ethnic differences कशी निर्माण करता येईल यामध्ये जास्त रस आहे असा आरोपही महेश तपासे Mahesh Tapase यांनी केला आहे.
Mahesh Tapase
Mahesh Tapasesarkarnama

मुंबई : ''राज्यातील व देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचं नाही, तर दुसरीकडे जातीय तेढ निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र, हे सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल,'' असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.

भाजपचे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी नको ते उद्योग करत आहेत. त्यातच भाजप खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेतला आहे. हनुमान चालीसा म्हणण्याऐवजी विकासाची संजीवनी लोकांपर्यंत पोचवा, अशी जोरदार टीका महेश तपासे यांनी केली आहे.

Mahesh Tapase
Video : अमोल मिटकरी यांच्या तोंडी हनुमान चालीसा : राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे भाजप खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी जाहीर केले होते. वास्तविक हे लोकप्रतिनिधींचे काम आहे का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे. मुळात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात विकासकामे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा असतो. मात्र, भाजपच्या विचाराने प्रेरित लोकप्रतिनिधींना जनतेच्या विकासकामांमध्ये रस नाही.

Mahesh Tapase
देशात फूट पाडण्यात धर्मांध शक्ती अपयशी ठरतील : नाना पटोले

त्यांना राज्यातील सरकार अस्थिर कसं होईल, धार्मिक व जातीय तेढ कशी निर्माण करता येईल यामध्ये जास्त रस आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. वीजनिर्मितीसाठी लागणार्‍या कोळशाचे संकट देशातील सात ते आठ राज्यात आहे, त्यात महाराष्ट्र आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त कोळसा मिळावा यासाठी आणि महागाईवर पंतप्रधानांवर दबाव आणायला हवा होता. कोळशाचे व वाढत्या महागाईचे नियोजन मोदी सरकारने का केले नाही याची विचारणा करायला हवी होती मात्र दुर्दैवाने भाजपचे लोकप्रतिनिधी हेच प्रश्न विचारताना दिसत नाहीत, असेही महेश तपासे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com