अनिल परबांच्या अडचणीत वाढ? केंद्र सरकारचे अधिकारी साई रिसॉर्टवर

राज्याचे माजी परिवहन मंत्री व शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Anil Parab
Anil Parab sarkarnama

दापोली : राज्याचे माजी परिवहन मंत्री व शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने परब यांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी चौकशीसाठी नेमलेली समिती साई रिसॉर्टवर दाखल झाली आहे. या टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था व महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत.

रिसॉर्टवर दाखल झालेल्या टीमकडून आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली याची चौकशी सुरु आहे. तसेच पर्यावरणाच्या हानीचीदेखील या टीमकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टने सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. साई रिसॉर्टमध्ये दाखल झालेली टीम ही रिसॉर्टप्रमाणेच, कोच रिसॉर्टचीदेखील चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे.

Anil Parab
शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ, सर्वत्र अंधेर नगरी, चौपट राजा !

रिसॉर्ट प्रकरणी महत्त्वाचे कागदपत्रे मिळावे यासाठी केंद्राच्या पर्यावरण विभागाची टीम दापोली प्रांत कार्यालयात दाखल झाली. परब यांच्या साई रिसॉर्टची पाहणी अधिकारी दापोली प्रांत कार्यालयात दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी दापोली प्रांत यांच्याकडे महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली, अशीही माहिती मिळत आहे.

Anil Parab
ED : संजय पांडे पुरते अडकले; चित्रा रामकृष्ण यांना अटक, ईडी पाळमुळं खणून काढणार

विशेष म्हणजे, राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच परब यांच्या साई रिसॉर्टची पुन्हा यंत्रणेकडून चौकशी सुरू झाली आहे. दापोली कार्यालयात महत्त्वाच्या माहितीसाठी बराच वेळ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. या प्रकरणात अनिल परब यांची ईडीने चौकशी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com