Eknath Shinde : ठाकरे, नार्वेकर सोबत येणार का ? ; मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान, म्हणाले..

Eknath Shinde : "आमच्यासोबत समविचारी पक्षांची संख्या वाढत आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raj Thackeray News
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raj Thackeray News sarkarnama

Eknath Shinde : शिंदे गट, भाजपसोबत मनसेची महायुती होणार का, ठाकरे गटातील नेते मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात सामील होणार ? अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान करीत भाष्य केले आहे. आपले शासकीय निवासस्थान 'वर्षा' येथे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री उशिरा माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर शब्दांचे बॅाम्ब फोडले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेसोबत युती , उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांचा शिंदे गटात प्रवेश याविषयांवर मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान करीत याबाबतची आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना खोचक प्रश्न विचारत टोला लगावला.

मिलिंद नार्वेकर तुमच्यासोबत कधी येणार?, असा प्रश्न पत्रकारांना मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, "आज तुमच्यासोबत (पत्रकार) फक्त दिवाळी मिलन आहे. कोणी कुठे जायचे हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा, अधिकाराचा विषय आहे,"

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raj Thackeray News
Mallikarjun Kharge : कॉंग्रेसनं कात टाकली ; नवी इनिंग सुरु, खर्गेंसमोर 'हे' मोठं आव्हान

राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सुरवातीला शिंदेंनी टाळलं नंतर ते म्हणाले, "आमच्यासोबत समविचारी पक्षांची संख्या वाढत आहे.

"तुमच्या दोघांमध्ये (भाजप-शिंदे आणि मनसे) फक्त पत्रांची देवाणघेवाण सुरू आहे,'असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, "सध्या उत्सव सुरू आहे. दीपोत्सवापूर्वी मी गणेशोत्सवातही त्यांच्या घरी गेला होतो. 2012 मध्ये महापालिका निवडणुकीच्या काळातही राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो. तुम्ही लोक प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून का पाहता ?"

"एका मंत्र्याकडे अनेक खात्यांचा कार्यभार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार करून राज्यमंत्र्यांची नियुक्ती करणे आवश्यक झाले आहे. राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे मंत्र्यांवरील कामाचा ताण थोडा कमी होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे,"असे शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com