PM Modi यांच्या खानपानावर किती खर्च होतो, जनतेच्या पैशांतून उधळपट्टी होते का ? RTI मधून माहिती उघड

PM Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'सूट-बूटवाली सरकार' अशा शब्दात टीका केली होती.
PM Narendra  Modi
PM Narendra Modi Sarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi)यांच्या कपड्यावर केंद्र सरकार किती रुपये खर्च करते, मोदींचे खानपान, कपडे यावर सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करते, असे अनेकांना वाटते. याबाबत आरटीआयमधून (RTI) मिळालेल्या माहितीवरुन मोदींवर सरकार किती खर्च करते, की ते स्वतः खर्च करतात, हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खानपानाबाबत चर्चा रंगतात. मोदींना खाण्यात महागडे मशरूम आवडत असल्याचे वृत्त समोर आले होते. यावरून सरकारी तिजोरीतील पैशांची ते उधळपट्टी करत असल्याच्या टीकाही त्यांच्यावर सोशल मीडियावर होत असते.

मोदींच्या कपड्यावर रोज १० लाख रुपये सरकार खर्च करते, असा आरोप काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'सूट-बूटवाली सरकार' अशा शब्दात टीका केली होती.

PM Narendra  Modi
Gulabrao Patil : शिंदेंसोबत जाताना सर्व देव आठवले, राजकारणात भांडणावेळी भांडण करायचे !

नेते, मंत्री यांचे पगार, त्यांची जीवनशैली याबाबत सर्वसामान्यामध्ये नेहमीच चर्चा रंगते. त्यांच्या सोयीसुविधांवर विरोधक नेहमीच टीका करीत असतात. यात मोदी यांचे दौरे, खानपान याबाबत नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगते. सध्या मोदींची खानपानाबाबत विशेष चर्चा आहे. याबाबत आरटीआरमधून मोदींच्या खानपानाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

"स्वतःच्या खानपानाचा खर्च पंतप्रधान मोदी स्वत:च्या खिश्यातून करतात, सरकारी बजेटमधून त्यांच्या खानपानावर एक रुपयाही खर्च केला जात नाही," अशी माहिती आरटीआयमधून माहिती कार्यकर्त्याला देण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे सचिव विनोद बिहारी सिंह यांनी हे उत्तर दिले आहे. "सरकारी बजेटमधून पंतप्रधान मोदींच्या जेवणावर एकही रुपया खर्च होत नाही," असे त्यांनी उत्तरामध्ये म्हटलं आहे.

कधीही सुट्टी मागितलेली नाही..

मोदींची लाईफस्टाईल , त्यांचे कपडे , राहणीमान, दिनचर्या , आवडीनिवडी , आहार याबाबत उत्सुकता असते. कुठल्याही पदावर कुठेही काम करत असताना प्रत्येक जण सुट्टी ही घेतोचं. पण याबाबतीत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर कार्यरत असताना आजच्या तारखेपर्यंत पीएमओ ऑफिसकडे कधीही सुट्टी मागितलेली नाही, अशी माहिती या आरटीआय मध्ये जारी करण्यात आली आहे. तसेच मोदी कायम ऑन ड्युटी असतात, त्यांच्या कामाचे तास ठरलेले नाही असं देखील यात नमूद करण्यात आलं आहे.

  • पंतप्रधान मोदींना (PM Modi) गुजराती जेवण (Gujarati Cuisine) अधिक आवडते.

  • बाजरीची रोटी (Bajra Roti) आणि खिचडी (Khichadi) हे मोदींचे सर्वाधिक आवडीचे पदार्थ आहेत.

  • त्यांचा आचारी बद्री मीणा (Cook Badri Meena) यांनी केलेला स्वयंपाक पंतप्रधानांना अधिक आवडतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in