बच्चू कडूही बंडात सामील; गंगाधरही शक्तीमान निकला!

शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार सुरतमधून गुवाहाटीत दाखल झाले आहेत.
बच्चू कडूही बंडात सामील; गंगाधरही शक्तीमान निकला!
Eknath Shinde with Shivsena MLA, Bacchu Kadu Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत 46 आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व आमदार सकाळीच गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. या बंडात प्रहार संघटनेचे बच्चू कडूही सामील असल्याचे स्पष्ट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे 'गंगाधरही शक्तीमान निकला' अशी चर्चा आता सुरू झाली आहे. (MLA Bacchu Kadu with Eknath Shinde)

महाविकास आघाडी अस्तित्वाl आली त्यावेळी बच्चू कडू यांच्यासह त्यांचे दुसरे आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. ते ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले सहकाही मानले जात होते. अत्यंत स्पष्ट विचार, शांत स्वभाव, कोणत्याही पक्षीय राजकारणात फारसा रस न घेणारे, आपला मतदारसंघ आणि गरजुंच्या मदतीसाठी धावून जाणारे अशी त्यांची ओळख आहे. (Political Crisis in Maharashtra)

Eknath Shinde with Shivsena MLA, Bacchu Kadu Latest Marathi News
अखेर कन्फर्म झालं...एकनाथ शिंदेंसोबत ३७ आमदार, ठाकरे सरकार पडणार?

पण शिंदे यांच्या बंडात ते सहभागी झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. काही वर्षांपूर्वी दुरदर्शनवर 'शक्तीमान' नावाची मालिका प्रसारित व्हायची. त्यामध्ये गंगाधर नावाचे एक पात्र होते. हे पात्र अत्यंत भोळसट दाखवले आहे. पण गंगाधर हाच शक्तीमान असतो. त्याचपध्दतीने बच्चू कडू यांनीही ठाकरेंना अशाच प्रकारे धक्का दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री यांच्याकडे आपण आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण आता डोक्यावरून पाणी गेलं आहे. मतदारसंघाला विकासासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो होतो. पण अपेक्षित निधी मिळत नसल्याने नाराजी आहे, असं कडू यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्यासमवेत ३७ आमदार असल्याचा दावा केला जात होता. प्रत्यक्षात तेव्हढे आमदार त्यांच्यासमवेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा गट टिकल्यास राज्यातील सरकार अल्पमतात येईल. त्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल. व्हायरल झालेल्या छायाचित्रात ३५ आमदार दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या समवेत श्रीनिवास वनगा, अनिल बाबर, नितिन देशमुख, लता सोनवणे, संजय शिरसाट, महेंद्र दळवी, भारत गोगावले, प्रकाश सुर्वे, सुहास कांदे, बच्चू कडू, नरेंद्र बोंडेकर (अपक्ष), संजय गायकवाड, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, किशोर पाटील, नितीनकुमार तळे, संदीपान भुमरे आणि महेंद्र थोरवे आहेत हे स्पष्ट झाले आहे. ही संख्या लक्षात घेता, राज्य सरकार अल्पमतात आल्याचे स्पष्ट झाले.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in