Andheri East by-election : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक रद्द होणार?

Andheri East by-election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे.
Rituja Latke
Rituja LatkeSarkarnama

Andheri East by-election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची माघार यावरुन मोठे राजकारण रंगले होते. मात्र, आता झालेल्या आरोपावरुन ही निवडणूक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाकडून माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच भ्रष्टाचारासंदर्भात निवडणूक आयोगात तक्रार देणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे.

Rituja Latke
प्रकल्प गुजरातला गेल्याचा जाब मुख्यमंत्री शिंदेंना चार हजार पत्राव्दारे विचारला

दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक अधिकारी, तसेच राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांची देखील घेणार भेट असल्याचे त्यांनी सांगतिले आहे. निवडणूक अधिकारी, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना अंधेरी पोटनिवडणूक रद्द करा, असे निवेदन देणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबई महापालिकेतील राजीनामा मंजूर करण्यासाठी ऋतुजा लटके यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. त्यानंतर भाजपने (BJP) निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतरही लटके यांच्या विरोधामध्ये नोटाला मतदान करा, अशा प्रकारची अॅडीओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंजक झाली आहे.

Rituja Latke
आमदार योगेश कदमांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी; कोकणातून संधी मिळणार?

मात्र, कांबळे यांच्या आरोपांमुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. कांबळे यांच्या मागणीची निवडणूक आयोग दखल घेणार का याकडे लक्ष लागले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. या आरोपांमुळे आता नवीन राजकारण रंगणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com