कोटा वाढवणं ही स्ट्रॅटेजी - मल्लिकार्जुन खर्गेंनी स्पष्टच सांगितलं

Mallikarjun Kharage new| राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील,'' असा विश्वास मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला आहे.
कोटा वाढवणं ही स्ट्रॅटेजी - मल्लिकार्जुन खर्गेंनी स्पष्टच सांगितलं
Mallikarjun Kharage news

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मतदानासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली. यामुळे आता राज्यसभेच्या मतदानाचा कोटाही बदलला. त्यामुळे शिवसेना- राष्ट्रवादी धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

''कोटा वाढवणं ही स्ट्रॅटर्जी असते त्यामुळे कोणताही परिणाम होत नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील,'' असा विश्वास मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला आहे.

Mallikarjun Kharage  news
मोठी बातमी : भाजप आमदारांचे क्रॉस व्होटींग; पक्षाच्या उमेदवाराचं भवितव्य धोक्यात

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी गुरुवारी (९ जून) थेट खासदार शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सुप्रिया सुळेही तिथे उपस्थित होत्या.

''आमचा प्रयत्न असा आहे की राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, भाजपा इतकीच मत विरोधी पक्षाकडे आहेत त्यामुळे मी अनेक पक्षांशी चर्चा करत असल्याचेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी बाबत मी चर्चा करू शकत नाही. बाकीचे सगळ्या पक्षाचे नेते बसून ठरवतील. या निवडणुकीत पवार पुढाकार घेतील सोनिया गांधी आणि त्यांचं बोलण झालंय. सोनिया गांधी बोलल्यानंतरच पवार आणि आमची भेट झाली. असंही खर्गे यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व समविचारी पक्षांची आम्ही लवकरच बैठक बोलविणार आहोत. त्या बैठकीत उमेदवार निश्चितीवर चर्चा केली जाईल', अशी माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी (९ जून) मुंबईत दिली. यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची भेट घेणार असल्याचेही खर्गे यांनी सांगितले. सर्व विरोधकांचा उमेदवार एकच असावा, यासाठी शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in