भाजपच्या मनात नक्की काय? : स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या कमी करण्याची मागणी

Chandrashekhar Bawankule | वाढवलेली सदस्यसंख्या त्वरीत रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे काल स्पष्ट झाले आहे. निवडणूक कार्यक्रमात बदलाचा अधिकार नाही, असे न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारले आहे.

स्थानिक स्वराज संस्थातील सदस्यसंख्या महाविकास आघाडी सरकारने वाढवली होती, त्याला भाजपने आक्षेप घेतला आहे. याबाबत भाजपने शिंदे सरकारकडे ही वाढवलेली सदस्यसंख्या रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव तर भाजपचा नाही ना, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Chandrashekhar Bawankule
Arjun Khotkar : आज निर्णय जाहीर केला तर काही लोकांना रात्रभर झोप लागणार नाही !

महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थातील नियमबाह्य पद्धतीने वाढवलेली सदस्यसंख्या त्वरीत रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (शुक्रवारी) दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या वाढवून घेतली. या स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्यसंख्या जनगणनेच्या आधारानुसारच वाढवली जाते. २०११ च्या जनगणनेनुसार एकदा सदस्यसंख्या वाढवल्यानंतर २०२१ च्या जनगणनेनुसारच ही संख्या वाढविली जाऊ शकते. या निर्णयाला राज्य निवडणुक आयोगाने मान्यता कशी दिली,"

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या जागांवरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं म्हटलं आहे. 367 स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमात कुठलाही बदल करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही फक्त तारखा बदलू शकता, असं न्यायालयाने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in