मोठी बातमी : परब यांचे निकटवर्ती आरटीओ अधिकारी खरमाटे अडचणीत

मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
RTO Bajrang Kharmate
RTO Bajrang KharmateSarkarnama

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील (Shivsena) अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने (Income Tax) नुकतीच छापेमारी केली होती. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्ती संजय कदम व आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) यांच्यावरही छापेमारी झाली आहे.

आरटीओ घोटाळा प्रकरणी पहिल्यांदा बजरंग खरमाटे यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी गजेंद्र पाटील या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून ईडीने काही दिवसापूर्वी खरमाटे यांच्यावर छापे टाकले होते. तसेच, खरमाटे यांची 8 तास चौकशी केली होती. खरमाटे हे मंत्री अनिल परब याच्या जवळच्या अधिकाऱ्यांपैकी मानले जातात. संजय कदम यांच्यावरही प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. कदम हे शिवसैनिक असून, परब यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. कदम हे केबल व्यावसायिक आहेत.

RTO Bajrang Kharmate
एसटी संपाचा तिढा सुटणार; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती काढणार तोडगा

राहुल कनाल यांच्यावरही छापे

दरम्यान, आज युवा सेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्ती व युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य असलेले राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या मुंबईतील घरी प्राप्तिकर विभागाने छापा मारला आहे. कनाल हे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्तही आहेत.

RTO Bajrang Kharmate
एक्झिट पोलनंतर 'मगोप'चा भाव वाढला; भाजपसह काँग्रेसनं टाकला गळ

बजरंग खरमाटे कोण आहेत?

आरटीओचे अधिकारी असणारे बजरंग खरमाटे यांच्यावर ईडीनं मागील वर्षी कारवाई करत त्यांची 8 तास चौकशी केली होती. खरमाटे यांच्यावर दोन वेळा गंभीर आरोप झाले होते. आरटीओ विभागातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भात ईडीने त्यांची चौकशी केली होती. पेण आणि सोलापूर येथे असताना खरमाटे दोन वेळा निलंबित झाले होते. बदली व पदोन्नतीसाठी त्यांच्या मुंबई व पुण्यात सतत फेऱ्या होत असल्याचा आरोपही झाला होता. यामुळे खरमाटे हे ईडीच्या रडारवर आले होते. आता खरमाटे यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com