आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेतील नेत्याच्या घरी 'प्राप्तिकर'ची धाड

मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
Rahul Kanal |Income tax raid News
Rahul Kanal |Income tax raid NewsSarkarnama

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील (Shiv Sena) अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने नुकतीच छापेमारी केली होती. त्यानंतर आता आणखी एक नेता अडचणीत आला आहे. युवा सेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यावर प्राप्तिकरनं धाड टाकल्याचे समोर आले आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरावरही छापेमारी झाल्याचे समजते. (Income tax raid News)

युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य असलेले राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या मुंबईतील घरी प्राप्तिकर विभागाने सकाळी छापा मारल्याचे वृत्त आहे. कनाल हे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्तही आहेत. या धाडसत्रामुळे शिवसेनेत पुन्हा खळबळ उडाली आहे. प्राप्तीकरच्या छाप्याबाबत अद्याप अधिक माहिती समजू शकलेली नाही.

Rahul Kanal |Income tax raid News
जुन्या प्रकरणात प्रसाद लाड अडचणीत; उच्च न्यायालयात घेतली धाव

दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज (ता. 8) दुपारी चार वाजता शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याआधीच शिवसेनेच्या नेत्याच्या घरी धाड पडल्याने चर्चेला उधाण आलं आहे. मागील पत्रकार परिषदेत राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्या व भाजवरही अनेक गंभीर आरोप केले होते. आजही ते भाजपवर शरसंधान साधण्याची शक्यता आहे. आज त्यांच्या रडारवर कोणता नेता असणार, याबाबत तर्कविर्तक लढवले जात आहेत.

यशवंत जाधव यांची चौकशी सुरू

सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. काळा पैसा मनी लॉंड्रिंगच्या बेकायदेशीर मार्गाने पांढरा करून घेण्यात यशवंत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही मागे टाकले आहे. त्यांच्या परिवाराचा घोटाळा आता चारशे कोटीच्या घरात गेला आहे, असा आरोप सोमय्या यांनी शनिवारी (ता.५) केला होता. उदय महावार या हवाला ऑपरेटरमार्फत जाधव यांनी कोट्यवधीचा काळा पैसा पांढरा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

Rahul Kanal |Income tax raid News
शरद पवारांनी उलगडले आपल्या राजकीय डावपेचाचे गूढ!

प्राप्तिकर विभागाने जाधव परिवाराचे चारशे कोटींहून अधिक व्यवहाराचे घोटाळे बाहेर काढले असून आता कंपनी व्यवहार मंत्रालयाने आपली कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली होती. जाधवांच्या जोडीने भुजबळ आणि गांधी परिवारावर त्यांनी पुन्हा मनी लॉंड्रिंगचा आरोप केला. जाधव यांचे काळ्याचा पांढरा पैसा केलेल्या महावार यानेच गांधी परिवाराच्या नॅशनल हेरॉल्ड कंपनीला अशी मदत केली होती, असे ते म्हणाले. जाधवांनी एक रुपयांचा शेअर पाचशेला विकून कमाल केली असल्याचे त्यांनी सांगितले. जाधव परिवाराचा काळा पैसा पांढरा करण्यात एक आयएएस अधिकारी गुंतला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com