Income Tax Raid On BBC: प्राप्तिकर विभागाचे दिल्लीसह, मुंबईतील बीबीसी वृत्त वाहिनीच्या कार्यालयावर छापेमारी

BBC IT Raid: दोन आठवड्यापूर्वी बीबीसीने गुजरात दंगलीवरील एक सिरीज प्रदर्शित केली होती.
Income Tax
Income Tax Sarkarnama

BBC IT Raid News Updates: प्राप्तिकर विभागाने दिल्लीसह मुंबईतील बीबीसी वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयावर छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. दोन आठवड्यापूर्वी बीबीसीने मोदी- द इंडिया क्वेश्चन हा दोन भागांचा माहितीपट प्रदर्शित केला. त्यानंतर या माहितीपटावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला होता. गुजरात दंगलीच्या वेळी २००२ मध्ये नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या दंगलीचा घटनाक्रमाबाबत परदेशी बीबीसी वृत्तवाहिनीने एक सिरीज प्रदर्शित केली होती. पण भारतात ती दाखवण्यावर बंदी घालण्यात आली. इतकेच नव्हे तर सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरुनही ती काढण्यात आली.

Income Tax
Supreme Court On ShivSena : अशाने तर कुणीही सरकार पाडू शकेल; सिब्बलांचा महत्त्वाचा युक्तीवाद

वाचा, काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावरील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंट्री ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’यावरुन देशात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ ही 2002 च्या गुजरात दंगलीवरील दोन भागांची मालिका आहे. या माहितीपटात त्या काळातील राजकीय परिस्थिती तसेच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित हा माहितीपट बनवण्यात आला आहे.

या माहितीपटाचा पहिला भाग १७ जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये प्रसारित झाला, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचे सुरुवातीचे राजकीय जीवन दाखवण्यात आले होते. माहितीपटातील बहुतांश भागात नरेंद्र मोदींविरोधातील गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

Income Tax
Devendra Fadnavis : पहाटेचा शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच; फडणवीसांच्या दाव्याने राज्यात खळबळ

माहितीपटात गुजरात दंगलीचा उल्लेख करून त्या काळात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या दंगलींमध्ये सुमारे २ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. गुजरात दंगलीची खरी कहाणी या माहितीपटात दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ब्रिटीश परराष्ट्र कार्यालयातून मिळवलेल्या अप्रकाशित अहवालावर बीबीसीचा हा माहितीपट आधारित आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या हिंसाचारात किमान दोन हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या गुजरात दंगली आणि त्या काळात घडलेला घटनाक्रम यावर या माहितीपटात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 2002 मध्ये गुजरातमध्ये हिंसाचाराचे वातावरण निर्माण करण्यासाठी मोदी 'थेटपणे जबाबदार' असल्याचा दावा ब्रिटिश परराष्ट्र कार्यालयाच्या अहवालात करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com