जाधवांचा पाय खोलात! प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

यशवंत जाधव हे शिवसेनेचे बडे नेते अन् मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष
Yashwant Jadhav
Yashwant JadhavSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav) यांच्या अडचणीत भर पडत चालली आहे. प्राप्तिकर विभागाने (Income Tax) आता त्यांच्या भोवतीचा फास आवळला आहे. जाधव यांच्या 56 मालमत्ता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत. जाधव यांनी तब्बल सहा कोटींचे दागिने रोखीनं घेतल्याचंही उघड झालं आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरी चार दिवस ठाण मांडून होते. या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड आली आहे. (Yashwant Jadhav News)

प्राप्तिकर विभागाने चौकशीच्या पहिल्या टप्यात जाधव याच्याकडे 36 मालमत्तांची नोंद केली होती. आता याता वाढ होऊन मालमत्तांची संख्या 56 वर पोचली आहे. त्यांच्या अन्य काही मालमत्तांचा तपास सुरू आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर जाधव राहत असलेल्या इमारतीतील अनेक घरेही जाधवांनी विकत घेतली आहेत. याच घरांच्या खरेदीतून त्यांनी 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जाधव यांनी एका ज्वेलर्सकडून तब्बल 6 कोटी रुपयांचे दागने रोखीने खरेदी केल्याचे तपासात आले समोर आहे. या ज्वेलर्सचा जबाब प्राप्तिकर विभागाने नोंदवला आहे. सलग चार दिवस प्राप्तिकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. यामुळे आगामी काळात जाधव याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जाधव राहत असलेल्या इमारतील 3 खोल्यांचे मालकी हक्क खरेदी करण्यासाठी त्यांनी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही उघड झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Yashwant Jadhav
रामदास कदमांचं चाललंय काय? आधी गावचा सप्ताह अन् आता मणक्याच्या दुखण्याचं कारण

प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस यशवंत जाधव यांच्या घरासह इतर मालमत्तांवर छापेमारी सुरू केली होती. काही दिवस ही कारवाई सुरू होती. त्यानंतर दीड महिन्याने प्राप्तिकर विभागाने जाधव यांच्याकडील 41 मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. जाधव यांच्या आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे मुंबईतील घर व कोकणातील मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. त्यातच जाधव यांच्यावर कारवाई झाल्यानं मुंबईत शिवसेना (Shiv Sena)भाजप (BJP) संघर्ष वाढला आहे.

Yashwant Jadhav
काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्यानं केला पक्षाला रामराम

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या डायरीत मातोश्री अशी नोंद असल्याने राजकारण तापलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याने भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर या डायरीत आणखी दोन नावं असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी पहिलं नाव 'केबलमॅन' असून त्याच्यासमोर एक कोटी 25 लाख रुपये दिल्याची नोंद होती. तर दुसरं नाव 'M-ताई' हे असून त्यासमोर 50 लाख लिहिले असल्याची माहिती समोर आली होती. ही दोन नावे म्हणजे नेमकं कोण, यावरून आता चर्चांना उधाण आलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com