इंच जागा, थेंब पाणीही इतर राज्यांना देणार नाही :मंत्री कारजोळ यांची दर्पोक्ती

राज्यातील पाटबंधारे योजना लागू करण्यासाठी सरकार सर्वप्रकारच्या उपाययोजना हाती घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली असल्याचे कारजोळ यांनी सांगितले.
इंच जागा, थेंब पाणीही इतर राज्यांना देणार नाही :मंत्री कारजोळ यांची दर्पोक्ती
Inch space, not even a drop of water will be given to other states: Minister Karjol

बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम असल्याचे नेहमीचे तुणतुणे राज्याचे जलसंपदामंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी वाजविले. तसेच कर्नाटकची एक इंच जागा व एक थेंब पाणीही कोणत्या राज्याला देणार नसल्याची दर्पोक्ती मंत्र्यांनी केली. शनिवारी (ता. ११) येथील सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कारजोळ यांनी राज्यातील सीमाप्रश्नाबाबत वक्तव्य करताना कर्नाटकच्या सीमेबाबत व पाणीवाटपाबाबत कुठेही तडजोड करणार नसल्याचे सांगितले. Inch space, not even a drop of water will be given to other states: Minister Karjol

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांबरोबर कर्नाटकचा वाद आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मंत्र्यांनी वरील वक्तव्य केले. मंत्री कारजोळ म्हणाले, ''बेळगाव सीमाप्रश्‍नाबाबत सरकार योग्य दिशेने काम करण्यासाठी कटिबद्ध आहे.'' या विषयावरून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असा सल्लाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला. आपण जलसंपदा मंत्रिपद स्वीकारून दोन महिने झाले आहेत. आंतरराज्य जलविवाद तसेच पाणी वाटपाबाबत केंद्रीय मंत्र्यांशी बैठक झाली आहे. 

राज्यातील पाटबंधारे योजना लागू करण्यासाठी सरकार सर्वप्रकारच्या उपाययोजना हाती घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली असल्याचे कारजोळ यांनी सांगितले. म्हादई आणि कृष्णा जलविवाद सोडविण्यासाठी प्रामाणिक कार्य करीत आहोत. कळसा-भांडुराचे कर्नाटक राज्याच्या वाट्याचे पाणी वापरण्यास आम्हाला कोणतीही समस्या नाही. कळसा-भांडुरा योजनेतील पाणी राज्‍याला मिळवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. यावेळी खासदार मंगल अंगडी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, राज्य प्रवक्ते ॲड. एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.

बेळगावचा गणेशोत्सव मागणीनुसार

बेळगावातील हिंदू संघटना, गणेशोत्सव महामंडळ आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीची दखल सरकारने घेतली आहे. तसेच येथील सार्वजनिक गणेशोत्सव दहा दिवस साजरा करण्याची मुभा दिली असल्याचे मंत्री कारजोळ यांनी सांगितले. येथील सुवर्णसौधमध्ये सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.