Ajit Pawar : राज्यातील सत्तांतराचा बारामतीच्या विकासावर परिणाम होणार नाही

Ajit Pawar : बारामतीचा सर्वांगीण विकास होताना सांस्कृतिक विकासालाही तितकेच महत्त्व आहे.
Ajit Pawar News in Marathi, NCP News,  i,
Ajit Pawar News in Marathi, NCP News, i, sarkarnama

बारामती : येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या कलादानाचे तसेच बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी बारामतीच्या विकासकामाबाबत सांगितले. (Ajit Pawar latest news)

"सत्ता येते आणि जाते मात्र राज्यात सत्तांतर झाले असले तरी बारामतीच्या विकास कामांना कोणत्याही प्रकारचा ब्रेक लागणार नाही," अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामतीत दिली. बारामतीचा विकास होत असताना शहराचा सांस्कृतिक विकास होणेही गरजेचे आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्यानंतर मी देखील काम केले.

नटराजचे अध्यक्ष किरण गुजर, अभिनेते भरत जाधव, माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे व संध्या बोबडे, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी महेश रोकडे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड ए.व्ही. प्रभुणे, आबा परकाळे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, " बारामती मध्ये वसंतराव पवार नाट्यगृहाचे नूतनीकरण केले जात असून लवकरच त्या ठिकाणी भव्य वास्तू उभी राहील. बारामतीचा सर्वांगीण विकास होताना सांस्कृतिक विकासालाही तितकेच महत्त्व आहे,"

"कऱ्हा नदीच्या सुशोभिकरणाच्या कामानंतर आता बारामती शहराला नदीच्या पुराचा धोका राहणार नाही, नदीचे अतिरिक्त पाणी शहराच्या विविध भागात येणार नाही," अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. क्रीडा संकुलाच्या विकासासाठी आणखी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्याचे काम देखील मी करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar News in Marathi, NCP News,  i,
RSS चे कौतुक करणाऱ्या ममता बॅनर्जींवर ओवेसी संतापले

किरण गुजर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला. बारामती गणेश फेस्टिव्हलची पार्श्वभूमी देखील त्यांनी या प्रसंगी विशद केले या वाटचालीमध्ये आलेल्या अनेक अडचणीवर मात करून पुढे जात असल्याचे ते म्हणाले. संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

बारामती साकारणार नऊ एकरांवर उद्यान..

"बारामती शहरांमध्ये प्रशासकीय भवन लगत असलेल्या नऊ एकरांच्या जागेत अतिशय सुंदर उद्यान विकसित करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. या नवीन उद्यानासह बारामतीतील इतर सर्व उद्यानांची अवस्था बदलणार असूनही उद्याने व्यवस्थित केली जातील," असे अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com