'आदित्य ठाकरेंनी २०१९ च्या निवडणुकीत कोणाच्या नावाने मते मागितली?'

एअरपोर्ट ते विधानसभा रस्ता हा वरळीतून म्हणजे आमच्याच मतदारसंघातून जातो, अशा धमक्या देणे चुकीचे आहे. धमक्यांची व्याजासह परतफेड करावी लागेल : मुनगंटीवारांचा आदित्य ठाकरेंना इशारा
 Sudhir Mungantiwar -Aditya Thackeray
Sudhir Mungantiwar -Aditya ThackeraySarkarnama

मुंबई : अनेक मोठे नेते सध्या धमक्या देत आहेत. एअरपोर्ट ते विधानसभा रस्ता हा वरळीतून म्हणजे आमच्याच मतदारसंघातून जातो, अशा धमक्या देणे चुकीचे आहे. तुम्ही अशा धमक्या देणार असाल तर लक्षात ठेवा, याची व्याजासकट परतफेड करावी लागेल, असा इशारा सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी युवा सेनेचे नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना दिला. (In whose name did Aditya Thackeray ask for votes in the 2019 elections: Mungantiwar)

वरळीतील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना ‘आयुष्यभर शिवसेनेसोबत राहणार,’ असे म्हणणाऱ्यांनी पक्षाला अचानक दगा दिला. पक्ष फोडला; पण शिवसेना आणि शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत. त्यांची खरी ‘फ्लोअर टेस्ट’ रस्त्यावर, विमानतळावर उतरल्यावर होईल. एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो, हे विसरू नका. विधानसभेत जाण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वांना येथूनच जावे लागेल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता. त्याला मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे.

 Sudhir Mungantiwar -Aditya Thackeray
एकनाथ शिंदेंच्या बंडात राज्यपालांची एन्ट्री; ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल?

आमदार मुनगंटीवार म्हणाले की, आता दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा, असा इशारा संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिल्यानंतर कोणी कोणाच्या बापाच्या नावाने मतं मागितली, हे सगळ्यांना माहीत आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये कोणाच्या नावाने मत मागितली, हे सर्वाना माहिती आहे. कोणाला मत द्यायचे, हा जनतेचा अधिकार आहे. रोज खालच्या पातळीवर बोलून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली नेण्याचे काम संजय राऊत करत आहेत.

 Sudhir Mungantiwar -Aditya Thackeray
मोठी बातमी : जळगावमधील दोन बंडखोर आमदार मंत्रिपदासाठी गुवाहाटीमध्येच भिडले?

तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाहीत आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचा दोष भाजपला देण्याची गरज नाही. यात ते निश्चितपणे चुकीच्या दिशेने जात असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

 Sudhir Mungantiwar -Aditya Thackeray
एकनाथ शिंदेंचं बंड पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद मिळवून देणार?

सरकार जायची वेळ आली तेव्हा शिवसेनेला काश्मिरी पंडित आठवले, स्वातंत्रवीर सावरकर आठवले. आता त्यांना एक एक सगळं आठवेल. देवेंद्र फडणीस दिल्लीला जात आहेत; म्हणून त्यांच्यावर आरोप लागावेत, असे वक्तव्य करणाऱ्यांची बौध्दिकता तपासलीच पाहिजे, असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 Sudhir Mungantiwar -Aditya Thackeray
शिवसेनेपाठोपाठ शिंदेही आक्रमक; निलंबन नोटीस, गटनेतेपदासाठी सुप्रीम कोर्टात जाणार

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे, यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, यापूर्वीही कंगना राणावत हिलासुद्धा केंद्राने सुरक्षा दिली होती, त्यामुळे या बंडखोर आमदारांच्या जीवाला धोका असेल आणि तशा पद्धतीची माहिती सरकारला मिळाली असेल तर ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे.

 Sudhir Mungantiwar -Aditya Thackeray
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल!

ता. २४ ऑक्टोंबर २०१९ रोजी जी पत्रकार परिषद झाली, ती या शतकातील सर्वात मोठी होती. पाठीत खंजीर खुपसणारी ही पत्रकार परिषद होती. भाजप-शिवसेना हे सोबत लढत असताना शिवसेना नेत्यांच्या मनात सत्तेचा मोह निर्माण झाला. त्यांना दिवसाही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिसू लागली, त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची भूमिका घेतली. हिंदूह्‌दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल, त्या दिवशी मी ही शिवसेना बंद करेल, अशी आठवणही सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com