युक्रेनच्या युद्धात 'ती' घरासोबतच देशही सांभाळत आहे - उद्धव ठाकरे

international women's day | CM Uddhav Thackeray| राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिलांना संबोधित केले.
 CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddha Thackeray) यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिलांना संबोधित केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत महिलांशी संवाद साधला. विशेष म्हणजे दैनिक सकाळ मध्ये महिला दिनानिमित्त आलेल्या लेखाचा उल्लेख करत महिलांच्या संघर्षावरही भाष्य केलं. (international women's day news)

- काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

अमेरिकेत १९०८ साली कामगार चळवळ झाली. त्यावेळी पंधरा हजार महिलांनी न्युयॉर्क शहरात आपल्या हक्कासाठी मोर्चा काढला. ज्या दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी या महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी आवाज उठवला, तो दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.

 CM Uddhav Thackeray
कनाल हा आदित्य ठाकरेंचा पुरवठा मंत्री! राणेंच्या आरोपांनी राजकारण तापलं

पण महाराष्ट्रात त्यांच्याही आधी अशा कर्तुत्वान महिला घडल्या, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, या महिलाही घडल्या. आजही आपण लवकरच महिला धोरणावर आपण काम करत आहोत. मंत्री मंडळातील प्रत्येक बैठकीत यशोमती ठाकूर महिला व बाल विकासबाबत मुद्दे मांडतात. एकही अशी बैठक नाही ज्यात यशोमतीजी महिला व बाल विकासाबाबत बोलत नाहीत.

आजच आपल्या मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी महिला पोलिसांच्या कामाचे आठ तास केले. या सर्व माताभगिणी कोरोना काळातही रस्त्यावर उतरून कुटुंबाची काळजी न करता. काम करत होत्या. महिलांना घराकडे, कुटुंबाकडे लक्ष द्यावंच लागतं. पण महिला पोलिस रक्षाबंधन, गुढीपाडवा, दिवाळी याची पर्वा न करता कामावर हजर राहातात. फक्त फायली क्लीअर करायचं काम नाही, तर बंदोबस्तावरही असतात.”

या सर्व महिला चूल आणि मुल हीची व्याख्या बदलून महिला पुरूषांच्य खांदाला खांदा लावून काम करत आहेत. या सर्व महिलांना आज मला धन्यवाद द्यायचे आहेत. आपणही एक ना एक दिवस मुल होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनाही वाढवणारी, त्यांचे संगोपन करणारी एक आईच होती.

कोरोनाच्या महामारीच्या काळातही महिला पोलीसांनी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांनी आपले कर्तव्य खूप उत्तमरित्या पार पाडले. आपल्या चिमुकल्या मुलांना घरी ठेऊन कोरोना काळात या महिला कामावर हजर होत्या. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा”, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 CM Uddhav Thackeray
नितीन गडकरींच्या नागपुरातच पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महाग!

राज्यसरकारने महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत, या महिलांपर्यंत या सुविधा पोहचल्या आहेत का? सार्वजनिक आयुष्यात आपण त्यांना काय सुविधा देत आहोत, त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या अनेक योजना त्यांच्या पर्यंत पोहचल्या पाहिजेत, अशा एक ना अनेक गोष्टी आपण करतो. आता त्यांनाही समजवून सांगायची गरज आहे. या महिलांना फक्त आधार देण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील अनेक महिलाही या युद्धात सहभागी झाल्याचे दिसत आहे. रशिया युक्रेनच्या युद्धात युक्रेनच्या महिलाही बंदुका घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. संकटांच्या या काळात त्या घरासह देशही सांभाळत आहेत. ही झेप काही लहान गोष्ट नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com