Uddhav Thackeray : व्यापाऱ्यांच्या राज्यात निकाल विकत घेतला; 'सामना'तून भाजपसह निवडणूक आयोगावर टीका

Samana and BJP : आमदार, खासदार विकत घेण्यापासून ते निकालापर्यंत सौदे झाल्याचा आरोप
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा आहे. व्यापाऱ्यांच्या राज्यात या निकालातून न्याय झाला नाही तर निकाल विकत घेतला आहे. यासाठी किमान दोन हजार कोटींचा सौदा झाला आहे. त्यातून आधी सरकार विकत घेतले. आता धनुष्यबाणाचा, शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला, असा आरोप सामना (Samana) वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray
Thackeray On Election Commission : ठाकरेंची मोठी मागणी : निवडणूक आयोग बरखास्त करा

ECI निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर शनिवारी पुण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप केले. याचा धागा पकडून समानातील संपादकीयमधून भाजप, अमित शाह यांच्यावर टीका केली. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालबाबात शंका व्यक्त केली आहे.

त्यात म्हटले आहे की, शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला (BJP) काही किंमत नाही, हे भाजपला समजले होते. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला आणि एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना मुख्यमंत्री केले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray :..तर येणारी लोकसभा निवडणूक शेवटची असेल; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

भाजपलाच जास्त आनंद

निवडणूक आयोगाच्या (ECI) निकालाचा शिंदे गटापेक्षा भाजपलाच जास्त आनंद झाला आहे. त्यामुळेच 'कमळी' घुंगरू तुटेपर्यंत नाचत असल्याचे नमूद केले. दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावे त्यानुसारच शिवसेना नाव आणि चिन्हाबाबतचा निकाल विकत घेतला आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची मेहेरबानी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray
Sanjay Raut : राऊतांचा पाय आणखी खोलात.. ; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार ?, नाशिकनंतर ठाण्यात..

निवडणूक आयोगावर टीका

आयोगाने ४० आमदार, १२ खासदार म्हणजे शिवसेना (Shivsena), असा निकाल देऊन लोकभावना व कायद्याचे धिंडवडे काढले. लाखो शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रांना आयोगाने किंमत दिली नाही. ज्यांना शिवसैनिकांनी निवडून आणले, त्यांची डोकी मोजून हा निकाल दिला आहे.

हे निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम बनल्याचे लक्षण असल्याचा आरोप केला आहे. यातून एखादा मोठा उद्योगपती आमदार, खासदार विकत घेऊन सरकार, देशावर मालकी हक्क सांगेल, अशी भितीही व्यक्त करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Naxalite attack : छत्तीसगड सीमेवर नक्षल-पोलिस चकमक, दोन जवान शहीद, मोटरसायकलही जाळली !

हुकूमशाही सुरू झाली का?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्याचवेळी भाजपने लोकशाहीवर घाला घातला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशात 'हम करे सो' कायद्याची हुकूमशाही प्रस्थापित झाल्याची घोषणा करावी. महाराष्ट्रातून बेबंदशाहीला सुरुवात झाली.

सत्तेचा यापूर्वी बेगुमान गैरवापर इतिहासात झाला नव्हता. त्याचा अंतही महाराष्ट्रातच होईल. त्यासाठी लढाई सुरू राहील. शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com