पटोले, थोरात, अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे सगळे मातब्बर फेल; तीन मते फुटली

Legislative Council elections : विधान परिषद निवडणूक निकाल
Bhai Jagtap, Chandrakant Handore, Nana Patole
Bhai Jagtap, Chandrakant Handore, Nana Patolesarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपचे (BJP) चार उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २ आणि शिवसेनेचेही (Shivsena) २ उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार दुसऱ्या फेरीत गेले आहेत.

पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर (Praveen Darekar) , राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे या विजयी झाल्या आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे दुसऱ्या फेरीत गेले आहेत.

Bhai Jagtap, Chandrakant Handore, Nana Patole
खडसे, अहिर, राम शिंदे, खापरे, भारतीय यांचा विजयाचा गुलाल...

भाई जगताप यांना १९ आणि चंद्रकांत हंडोरे यांना २२ मते मिळाली आहेत. काँग्रेसची स्वतःची ४४ मते आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारांना ४१ मते मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची ३ मते फुटली आहेत. हा मोठा धक्का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना बसला आहे. त्यांना आपली सगळी मते एकत्र ठेवता आलेली नाहीत.

Bhai Jagtap, Chandrakant Handore, Nana Patole
ठाकरे सरकारला धक्का : महाविकास आघाडीची तब्बल वीस मते फुटली

काँग्रेसची मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ४४ आमदार असताना त्यांना ४१ मते मिळाली. त्यामुळे नेमकी कोणत्या तीन आमदारांची मते फुटली असा मोठा प्रश्न आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या अपक्षांचे काय झाले हाही मोठा प्रश्न आहे. निवडणुकीमध्ये २८५ आमदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये दोन मते बाद झाल्यामुळे २८३ मते वैध ठरली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com