
Thane News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे.आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षात जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: या सगळ्यांना शिवबंधन बांधत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. (In Thane, hundreds of BJP Youth Morcha activists, office bearers joined the Thackeray group)
यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवही उपस्थित होते. यामुळे एक प्रकारे ठाण्यात भाजपच्या गडाला सुरंग लागल्याच चित्र दिसत आहे. राज्यातील सत्तांतरानंतर दिवसेंदिवस ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. गेल्या नऊ -दहा महिन्यात शेकडो जणांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. पण आता त्यांच्याबद्दल असलेल्या सहानभुतीमुळे अनेकजण पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करु लागल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक विचारांवर विश्वास ठेवत आपण पक्षप्रवेश करत असल्याची भावना यावेळी या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी, शहापूर तालुका उपाध्यक्ष तेजस पडवळ, तालुका उपाध्यक्ष प्रमोद निचिते, भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस शशांक गुरुनाथ हरड, ग्रामपंचायत खरीवली सरपंच नीता वातेस, उपसरपंच शिवानी शशांक हरड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांसह शिवबंधन बांधून ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश घेतला. (Latest Maharashtra News)
Edited By-Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.