Thane Politics : ठाण्यात राष्ट्रवादीचा बुरुज ढासळतोय; जगदाळेंसह पाच माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार !

राज्यातील संत्तातरापासून महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना लागलेली गळती कमी होण्याचं नाव घेत नाहीये.
Eknath Shine
Eknath ShineSarkarnama

Thane Politics : राज्यातील संत्तातरापासून महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना लागलेली गळती कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील काही नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Hanmant Jagdale
Hanmant Jagdale Instagram

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे स्वतः हणमंत जगदाळे यांनीच याबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे हणमंत जगदाळेंनी निवेदनात?

जगदाळे यांनी एक निवदेन जारी केलं आहे. “ गेली अनेक वर्षांपासून ठाणे शहरातील राजकारण व समाजकारणात काम करत असताना आपण मला प्रत्यक्ष किया अप्रत्यक्षपणे मोलाची साथ दिली. अगदी कठीण काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी आपुलकीने माझ्या प्रत्येक सुख - दुःखात मला मोलाची साथ दिलीत. आपल्या वयाचा व बदलत्या परिस्थितीचा विचार केला तर ज्या नागरिकांनी इतके वर्ष आपल्यावर विश्वास टाकला, त्या नागरिकांच्या विकासासाठी योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे. नाहीतर काळ हा आपल्याला कधीच माफ करणार नाही.

Eknath Shine
Ajit Pawar : ''...तर अजितदादा आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे पुढील उमेदवार असतील!''; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

एकंदरीत परिस्थितीचा सारासार विचार करता आणि सर्व बाबी लक्षात घेता मी व माझे सर्व सहकाऱ्यांनी रविवारी (१२ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता लक्ष्मीपार्क सर्व्हिस रोड वरील मोकळ्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे मा . मुख्यमंत्री महोदय, श्री . एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या साक्षीने मा . शिंदे साहेबांच्या गटा सोबत जाण्याचा विचार निश्चित केला आहे. तरी मी या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष व ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी तसेच ज्येष्ठ सहकारी यांनी मला गेली अनेक वर्षांपासून प्रेम, मानसन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. यापुढे सुद्धा राजकारण व समाजकारण मध्ये वावरत असताना आपले स्नेह संबंध आहेत तसेच राहतील हि अपेक्षा." असे जगदाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी येत्या 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे 12 वाजवणार, असं सूचक विधान केलं होतं. त्याच्या आधीपासूनच जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढल्याचीही ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमध्ये वाढलेल्या जवळकीमुळेच राष्ट्रवादीच्या 12 ते 15 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सरु होत्या. आता म्हस्केंचा हा दावा खरा ठरताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com