Ajit Pawar : पत्रकार परिषदेत अजितदादांच्या मनातलं ओठावर आलं; उद्धव ठाकरेंना म्हणाले...

Ajit Pawar News : भर पत्रकार परिषदेत हा किस्सा घडल्याने एकच चर्चा रंगली
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : महाविकास आघाडीने आज शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. यासाठी आघाडीची महत्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत घेत १७ तारखेला मुंबईत विराट मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री’ असा केला. भर पत्रकार परिषदेत हा किस्सा घडल्याने एकच चर्चा रंगली. त्यामुळे अजित पवार यांच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे राज्यात राज्यात सत्तांतर घडलं. हे सगळं घडलं असलं तरी अजित पवार यांच्या मनात अजूनही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, अशी चर्चा आजचा किस्सा घडल्याने रंगली आहे.

Ajit Pawar
PM Narendra Modi : २०२४ च्या निवडणुकीसाठी मोदींचा नवा मंत्र; गावागावात जा आणि...

महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत पत्रकार परिषदेत पार पडली. यामध्ये अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री’ असा केला. मात्र आपली चूक लक्षात येताच लगेच माजी मुख्यमंत्री असा उल्लेख उद्धव ठाकरे यांचा केला. त्यामुळे त्यांनी आपली चूक लगेच सावरली. पण त्यानंतर सोशल मीडियावर अजित पवार यांच्या मनात आजही मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) तर नाहीत ना? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Ajit Pawar
Udayanraje Bhosale : माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना मोठं होता येत नाही; उदयनराजेंचा इशारा कुणाकडे

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक विधान करण्यात आली. त्याविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi) येत्या १७ तारखेला मुंबईत (Mumbai) विराट मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर या मोर्चात आघाडीतील पक्ष सहभागी होणार आहेत. याविषयीची घोषणा करतानाच्या पत्रकार परिषदेत हा किस्सा घडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com