आरएसएसचा २००४ मध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट होता?; धक्कादायक व्हिडीओ काँग्रेसने ट्वीट केला

काँग्रेस (Congress) नेते पवन खेरा यांनी हा धक्कादायक व्हिडीओ ट्वीट केला आहे
rss, congress
rss, congress

मुंबई : RSS चा २००४ च्या लोकसभा निवडणुकांआधी देशभरामध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट होता, असा धक्कादायक दावा संघटनेमध्ये प्रचार म्हणून काम करणाऱ्या यशवंत शिंदे यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये १९९५ पासून प्रचारक म्हणून काम करणाऱ्या शिंदेंचा व्हिडीओ काँग्रेसचे (Congress) नेते पवन खेरा यांनी ट्वीट केला आहे. यामुळे सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगली आहे.

या संदर्भातील व्हिडीओ काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी ट्वीट केला आहे. या ट्वीटमध्ये खेरा यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेल्या यशवंत शिंदे यांनी दिलेल्या कबुली जबाबामध्ये संघाच्या देशविरोधी कारवायांसंदर्भातील माहितीवर प्रकाश टाकला आहे. संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात होता. त्यामध्ये कोणकोण सहभागी आहे याहून मोठी ब्रेकिंग न्यूज काय असू शकते? असा सवाल खेरा यांनी यशवंत शिंदेंचा व्हिडीओ ट्वीट करुन केला आहे.

rss, congress
भाजप नेत्यांसोबत पंगा घेतलेल्या अधिकाऱ्यांना टेंन्शन की एक्‍सटेंशन?

दरम्यान हाच व्हिडीओ काँग्रेसच्या अधिकृत खात्यावरुन कोट करुन रिट्विट करण्यात आला आहे. त्यामध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक शिंदे यांनी संघाकडून केल्या जाणाऱ्या देशाविरोधातील कारवायांबद्दल केलेल्या दाव्यांची उच्च स्तरीय चौकशी केली पाहिजे. निवडणुक जिंकण्यासाठी देशाविरोधात कट रचणारे राष्ट्रवादी नसतात. या कटातील प्रत्येक व्यक्तीविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती संघासाठी काम करत होते, असे सांगत आहे. ''मी यशवंत शिंदे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १९९५ पासून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचारक होतो. अनेक वर्ष बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व संघाचे काम पाहिले आहे. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन काम केले आहे. २००६ मध्ये नांदेडमध्ये जो बॉम्बस्फोट झाला. त्या प्रकरणात मी २९ ऑगस्टला विशेष न्यायालयामध्ये हजर राहून मला साक्षीदार करावे म्हणून विनंती केल्याचेही या व्यक्तीने सांगितले आहे. न्यायालयाने माझा अर्ज स्वीकारला, असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. सरकारी वकील तसेच या खटल्यातील आरोपींना नोटीस पाठवली आहे, असेही व्हिडीओमधील व्यक्ती सांगत आहे.

rss, congress
Mla Bamb : शिक्षक, पदवीधर आमदारांची आता गरज नाही, त्यांचे मतदारसंघच रद्द करा..

तसेच पुढील महिन्यात २२ तारखेला मी काल सादर केलेल्या मुकदम्यावर ते मत मांडतील. या प्रकरणात जे आरोपी पकडले गेले ते मैदानातील आहे. मूळ आरोपी ज्यांनी कट रचला ते अजूनही मोकाट फिरत आहे. तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीच मूळ आरोपींना हात लावला नाही, असा धक्कादायक आरोप त्या व्यक्तीने केला आहे. त्यातील मूळ आरोपी आहे मिलिंद परांडे, हा आज अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेचा राष्ट्रीय संघटक असल्याचे व्हिडीओतील व्यक्तीने म्हटले आहे. पुढे बोलताना ती व्यक्ती म्हणाली २००३-०४ च्या सुमारास परांडे महाराष्ट्रात संघटक होता. त्यानेच माझ्याकडून सुपारी घेऊन २००३ ला बॉम्बस्फोट करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याचे सुरु केले होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीआधी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट होता, असे धक्कादायक वक्तव्य या व्हिडीओतील व्यक्तीने केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in