राज ठाकरेंच्या भाषणावर इम्तियाज जलील म्हणाले: आम्हीही...

Raj Thackeray| AIMIM|Imtiaz Jaleel| राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेतही मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहत जाहीर इशाराच दिला
राज ठाकरेंच्या भाषणावर इम्तियाज जलील म्हणाले: आम्हीही...
Imtiaz Jaleel on Raj Thackeray, Imtiaz Jaleel Latest News Updates, Imtiaz Jaleel Latest Marathi News, Raj Thackeray News, loudspeaker controversy NewsSarkarnama

मुंबई : 'तोंड आम्हालाही आहे. राज ठाकरे (Raj Thackaray) ज्या अविर्भावात बोलतील त्याच अंदाजात आम्हीही प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्हीही जशास तसं प्रत्युत्तर देऊ शकतो, पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निर्णय घ्यायला हवा." अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी दिली आहे. (Imtiaz Jaleel on Raj Thackeray)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेतही मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहत जाहीर इशाराच दिला. औरंगाबादेतील भाषणावरून राज यांच्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. राज यांनी काल मांडलेल्या भूमिकेवर खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.

Imtiaz Jaleel on Raj Thackeray, Imtiaz Jaleel Latest News Updates, Imtiaz Jaleel Latest Marathi News, Raj Thackeray News, loudspeaker controversy News
Aurangabad : राज गर्जना झाली, पण शिवसेना, उद्धव ठाकरेंवर टीका न करता..

चिथावणखोर विधानं करायची नाहीत, लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवायचा, अशा अनेक अटी पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देताना घातल्या होत्या. पण राज ठाकरेंनी सगळ्याच अटींचं उल्लंघन केलं. आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. आम्ही अशी विधानं केली असती, तर लगेच आमच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असते, मग राज यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का, असा सवालही जलील यांनी विचारला.

राज ठाकरे (Raj Thackaray) यांच्या औरंगाबादेतील सभेकडे केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे लक्ष लागले होते. तुडुंब भरलेल्या गर्दीसमोर भाषण करतांना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणातील बहुतांश वेळ त्यांनी राष्ट्रवादीमुळे सुरू झालेले जातीपातीचे राजकारण यावर प्रहार करतांनाच राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात चार तारखेनंतर ऐकणार नसल्याचा इशारा राज्य सरकारला दिला. गुडीपाडव्याच्या सभेत पहिल्यांदा राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थित केला.

परंतु याच सभेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत टीका केली होती. ठाण्याच्या सभेत देखील त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. औरंगाबादच्या सभेत मात्र राज ठाकरे यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भ्र शब्द देखील काढला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.