मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक : पुनर्वसन धोरणाला मंजुरी मिळेल?

Cabinet News : नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राज्याचं नवीन पुनर्वसन धोरण येणार आहे.
Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath Shinde
Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath ShindeSarkarnama

मुंबई : राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची आज मोठ्या कालावधीनंतर महत्त्वाची बैठक होणार आहे. सण आणि उत्सवाच्या धामधूमीत मागील काही काळात मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet News) झाली नव्हती. अखेर आज ही बैठक पार पडत आहे. राज्यातील अनेक प्रश्नांवर अद्याप निर्णय झालेला नाही, या बैठकीत तरी त्याबाबतत निर्णय घेण्यात येईल का ? याची प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे, राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला पूर, जमिनीला पडलेल्या भेगा, भूस्खलनचा धोका, दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी आता राज्याचं नवीन पुनर्वसन धोरण येणार आहे.

मागच्या महिन्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. दहीहंडीतील गोविंदांना नोकऱ्यामध्ये आरक्षण यासह भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, 75 वर्षे वय पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेतील बस मधून संपूर्ण मोफत प्रवासाची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath Shinde
"याकूब कबर प्रकरणी फडणवीस आरोपीच्या पिंजऱ्यात पण.." सामनातून जळजळीत टीकास्त्र

राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळे, दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी महाराष्ट्रातील दरवर्षी अनेक विभाग, अनेक नागरिका ग्रस्त होत असतात. अशा नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कोणतंही धोरण नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन, पुनर्वसन धोरण येणार आहे. नव्या पुनर्वसन धोरणामध्ये काही नवे निकष आणि नियमातील सुधारणा समाविष्ट करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यानंतर आवश्यक मदत त्वरीत पोहचवण्याचे अधिकार नविन पुनर्वसन धोरणात ठरवण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी होणारी दिरंगाई टाळण्याचा विचार या नव्या धोरणात केला जाणार आहे.

सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. बैठकीत राज्याच्या सत्तासंघर्ष वादाची चर्चाही होऊ शकते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या परिस्थीतीवर चर्चा होऊ शकते. तसेच लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाबाबत आणि उपाययोजनांबाबत चर्चा होऊ शकते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत पंचनामा करून, ही मदत लवकर कशी दिली जाईल, यावर देखील चर्चा आजच्या बैठकीत होणे अपेक्षित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in