PM मोदींची पाठ वळताच भाजप नेते अॅक्शन मोडवर; फडणवीसांच्या बंगल्यावर खलबत

PM Narendra Modi | Devendra Fadnavis | : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना नेमका काय कानमंत्र दिला?
PM मोदींची पाठ वळताच भाजप नेते अॅक्शन मोडवर; फडणवीसांच्या बंगल्यावर खलबत
BJP Latest Marathi News, Devendra Fadnavis NewsSarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण, मुंबईमधील राजभवानातील 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन, मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यानंतर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव अशा मान्यवरांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. (BJP Latest Marathi News)

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठ वळताच राज्यातील भाजप नेते अॅक्शन मोडवर आले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार असे महत्वाचे नेते उपस्थित होते. (Devendra Fadnavis News)

या बैठकीनंतर बोलताना आशिष शेलार म्हणाले, निवडणूक झाली नसती बरं झालं असतं, मात्र महाविकास आघाडीच्या अट्टहासापायी निवडणूक लादली आहे. या निवडणुकीची पुनर्बांधणी सुरू असून त्यात १०० टक्के यश मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यातील बैठक आहे. आम्ही सगळे सामूहिकतेने जसे राज्यसभा निवडणुकीसाठी रणनिती केली तशीच आता होईल. आमचे सर्व पाचही उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीला हार पचवावी लागेल. सर्व आमदार त्यांचा सततविवेकी बुद्धीने मतदान करतील, असेही शेलार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in