Anil Parab vs Kirit Somaiya : परब आक्रमक झाले अन् म्हाडाने नांगी टाकली; सोमय्यांच्या विरोधात थोपडले दंड

Anil Parab and MHADA : अनधिकृत बांधकामाशी काही संबंध नसल्याचे म्हाडाकडून स्पष्ट
Anil Parab
Anil ParabSarkarnama

Anil Parab News : अनधिकृत बांधकामाबाबत माजी मंत्री अनिल परब यांची म्हाडा कार्यालयात तब्बल साडेचार तास चौकशी झाली. म्हाडा कार्यालयातून बाहेर येत त्यांनी थेट भाजपचे नेते किरीट सोमया यांना लक्ष्य केलं. सोमयांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सांगत त्यांनी म्हाडाने दिलेलं पत्रंच प्रसार माध्यमांसमोर वाचून दाखविलं.

यावेळी अनिल परब (Anil Parab) म्हणाले की, अनेक वर्षांपासून किरीट सोमया (Kirit Somaiya) माझ्यावर अनधिकृत बांधकामाबाबत आरोप करीत आहेत. त्यावर मी ते माझे बांधकाम नसल्याचे वारंवार सांगत होतो. मात्र आरोप करायचे थांबले नाहीत. दरम्यान मला म्हाडाने नोटीस दिली. आज चौकशीत सोमय्या यांचे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झालं आहेत. त्यांचा खोटेपणा माहिती असल्यानं त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Anil Parab
Cabinet Meeting : राज्य सरकारचे १५ मोठे निर्णय! सर्वसामान्यांना होणार 'हा' फायदा

परब सांगितले की, "गेले दीड वर्षे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आरोप करीत होते की, अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय आहे. त्यावर मी वारंवार सांगत होतो की, अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय आहे. त्यावर मी वारंवार सांगत होतो की, ते कार्यालय माझं नसून सोसायटीचं आहे. सोसायटीच्या सहमतीनं ती जागा मला वापरण्यास मिळाली आहे. मात्र सोमया हे कार्यालय माझं असून ते अनधिकृत असल्याचा आरोप करीत राहिले. आज तो आरोप सपशेल खोटा ठरला आहे", असं म्हणत परब यांनी थेट म्हाडाने दिलेलं पत्रच वाचून दाखवलं. त्यात माझा आणि या कार्यालयाचा काही संबंध नसल्याचा उल्लेख असल्याचंही परब म्हणाले.

Anil Parab
Satyajeet Tambe; विखे-पाटील यांना सत्यजीत तांबे आमदार झालेले चालतील का?

अनिल परब (Anil Parab) यांनी वाचून दाखविलेल्या म्हाडाच्या पत्रात नमूद केलं आहे की, "गांधीनगर वांद्रे पूर्व येथील इमारत क्रमांक ५७ व ५८ येथील मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या बांधकामांशी माजी आमदार अॅड. अनिल परब यांचा संबंध आढळून येत नाही. तसेच म्हाडा कार्यालयामध्ये २७/६/२०१९ रोजी परब यांच्या नावे जारी केलेली नोटीस आम्ही मागे घेतलेली आहे."

Anil Parab
Andhra Pradesh New Capital: आता अमरावती नाही, विशाखापट्टनम असेल आंध्रप्रदेशची नवी राजधानी, वाचा इनसाईड स्टोरी

यानंतर परब यांनी आक्रमक होत सोमया यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "या पत्राचा अर्थ म्हणजे अनेक वर्षांपासून किरीट सोमया मला बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून खोटं बोलत आहेत. त्यांचे आरोप आज म्हाडाने खोटे ठरविलेले आहे. त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com