शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईतही बेकायदा इमारती; सोमय्यांचा आरोप

गेल्या काही वर्षातील शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळे मध्यमवर्गीय मुंबईकरांची अडचण झाली आहे.
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama

मुंबई : नोएडातील अनधिकृत टॉवर (Noida Twin Towers) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी पाडण्यात आले. पार्श्वभूमीवर मुंबईतील अशा अनधिकृत टॉवर्सचे काय करणार असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

Kirit Somaiya
ज्ञानवापीनंतर मथुरेतही व्हिडीओग्राफी सर्वेक्षण : उच्च न्यायालयाचे आदेश

या संदर्भात माजी खासदार सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गेल्या अनेक वर्षात मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे अनेक अनाधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. यातील अनेक इमारतींना अर्धवट भोगवटा पत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Kirit Somaiya
Hindutva| 'मुली आणि मुलांनी एकत्र वर्गात बसणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही'

गेल्या काही वर्षातील शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळे मध्यमवर्गीय मुंबईकरांची अडचण झाली आहे. या अडचणीतून त्यांना सोडविण्यासाठी अशा अनधिकृत बांधकामांची आणि सदनिकांचे ऑडिट करण्यात यावे. त्यातून मध्यमवर्गीय मुंबईकरांना दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा माजी खासदार सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

दिल्ली जवळील नोएडातील दोन धोकादायक इमारती रविवारी पाडण्यात आल्या. या पाश्‍र्वभूमीवर मुंबईतील अनाधिकृतपणे बांधलेल्या इमारतींचा प्रश्‍न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येकी ३२ मजल्याचा दोन इमारती रविवारी पाडण्यात आल्या. देशातली अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातून प्रत्यक्ष टॉवर पडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in