निवडणुकीत मत द्यायचे तर द्या नाहीतर देऊ नका; नितीन गडकरींना नक्की म्हणायचंय काय?

Nitin Gadkari| चांगलं काम करणारा नेता लोकांना पाहिजे असतो.
Nitin Gadkari|
Nitin Gadkari|

मुंबई : पुढच्या निवडणुकीत मी कटआउट लावणार नाही की कार्यकर्त्यांना चहापाणी करणार नाही आणि पोस्टरही लावणार नाही. निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ असे म्हटले तरीसुद्धा लोक मत देतील, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुढील निवडणूकीचे संकेत दिले आहेत. तसेच, लोकांना काम करणारी माणसं हवी आहेत, असेही त्यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. असे असतानाच गडकरींनी पुढील निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट'च्या दीक्षांत कार्यक्रमात बोलत होते.

Nitin Gadkari|
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे ३ वाजता पोहोचणार नांदगाव राख बंधाऱ्यावर...

चांगलं काम करणारा नेता लोकांना पाहिजे असतो. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. माझ्या स्वागतासाठी किंवा मला पोचवायला एकही माणूस येत नाही. मी कधी स्वत: चा कटआउटही लावला नाही आणि दुसऱ्याचाही कटआउट लावत नाही. पण तहीरी निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ असं म्हटलं तरीसुद्धा लोक मत देतील. असही त्यांनी यावेळी म्हटलं.

लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत गडकरी म्हणाले की, मुंबई-पुणे महामार्ग बांधल्यानंतर टोलच्या नावाने ओरडा सुरु झाला. पण त्यावर तुमचाच वेळ वाचला, महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली. मुंबई पुणे महामार्ग आणि सी लिंकचे पैसे वसूल झाले. तुम्ही लोकांना चांगली सेवा दिली तर तेही पैसे काढायला तयार होतात, असेही गडकरी यांनी सांगितले.

आता मुंबईकरांना नरिमन पॉईंट ते वसई असा प्रवास अवघ्या 15 मिनिटात करता येणार आहे. त्यासाठी कामही सुरू झाले आहे. देशभरात आतापर्यंत 45 लाख कोटींची कामे केली. तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे हे आम्ही पाहत आहोत. कामांच्या निविदांसाठी आम्ही ई-टेंडरिंग प्रक्रिया राबवत आहोत. लोकांना नगरपालिका, महापालिकेत येण्याची वेळ येऊ द्यायची नाही, त्यांची कामे मोबाइलवर झाली पाहिजे, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in