The kashmir files तुम्हाला काश्मीर फाईल्सचं इतकं कौतुक असेल तर...

devendra fadanvis| jayant patil विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही 'काश्मीर फाईल्स' बघायला गेल्याचे सांगितले
jayant patil -devendra fadanvis
jayant patil -devendra fadanvissarkarnama

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (२३ मार्च) काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सभागृहात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. आम्ही डंके की चोट पे काश्मीर फाईल्स गेलो होतो, असं विरोधी पक्षनेते फडणवीसांनी सांगितले. त्यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Jayant Patil replied to Devendraa fadanvis)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आम्हाला विधानसभेत बोलायला वेळ दिला जात नसल्याची तक्रार केली. त्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, जे उपस्थित असतात त्यांना वेळ दिला जातो, असं म्हणत फडणवीसांना उत्तर दिले. त्यानंतर आम्ही डंके के चोटे पे काश्मीर फाईल्स बघायला गेलो होतो. ज्यांना आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे, असे देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. तर जयंत पाटील यांनीही फडणवीसांच्या या वक्तव्यावर त्यांना प्रत्युत्तर दिले.

jayant patil -devendra fadanvis
तुम्हीच सांगा नाना भाऊ माझी काय चूक? महिला पदाधिकाऱ्याची आर्त हाक...

'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा मध्यंतरानंतर कंटाळवाणा आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही, फक्त चित्रपटाच्या निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मिरी पंडितांना घरे बांधण्यासाठी रक्कम दान करायला सांगा, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली. काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते, असे जयंत पाटील म्हणाले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही 'काश्मीर फाईल्स' बघायला गेलो होतो 'डंके की चोट पे' असे वक्तव्य केले. ज्यांना आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे असे त्यांनी ओरडतच सांगितले. यावर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावले.

दरम्यान, मंगळवारी (२२ मार्च) जे लोक उपस्थित होते त्या सर्वांना बोलण्याची संधी दिली. पण, फडणवीसांना काहीतरी गैरसमज झाला आहे 'काश्मीर फाईल्स' वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजप आमदार योगेश सागर जागेवर बसूनच, जोरजोरात बोलून गोंधळ करत असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील संतापले. खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा, आम्हालाही खाली बसून बोलता येते, त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका, असे स्पष्ट शब्दात जयंत पाटील यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com