'आम्ही काही बरंवाईट केलं तर त्याला जबाबदार राणे असतील'

Disha Salian|Nitesh Rane| BJP| महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सॅलियनच्या कुटुंबियांची भेट घेतली
Disha Salian
Disha Salian

मुंबई : 'दोन वर्षे झाली या प्रकरणाला ही केस बंद झाली आहे. तरीही आम्हाला त्रास दिला जात आहे. आम्ही दररोज मरतोय, खूप त्रास दिला जातोय या आरोपांमुळे आम्हाला ही जगण्यात अर्थ राहिला नाही. या पुढे आम्ही जर का काही बरवाईट करून घेतलं त्याला हे जबाबदार असतील, राणेंना विनंती आहे, मी माझ्या एकुलती एक मुलीला मी गमावलं आहे. माझी मनस्थिती समजून घ्या, अशी विनंती करताना दिशा सॅलियनची आई वसंती सॅलियन यांना अश्रु अनावर झाले होते. यावेळी दिशाचे वडील सतिश सॅलियन हेदेखील उपस्थित होते. 'जर आम्हाला अशाच प्रकारे बदनाम केलं तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू आणि याला जबाबदार हे असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Disha Salian case latest news update)

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushantsingh Rajput) याची मॅनेजर दिशा सॅलियन हिचा बलात्कार करून तिची हत्याच करण्यात आली आहे. सुशांतसिंग आणि दिशा यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला.

Disha Salian
दिशा सॅलियन प्रकरण: नितेश राणेंचे सुचक ट्विट; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक खुलासा

या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात थेट महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यासंबंधीचे एक पत्रही त्यांनी महिला आयोगाला पाठवले आहे. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सॅलियनच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महिला आयोगाच्या दोन सदस्या आणि माध्यमांचे प्रतिनिधीही होते. यावेळी दिशाच्या आईने नारायण राणेंना आणि भाजपला आपल्या मुलीची बदनामी करु नका, अशी विंनती केली आहे.

माझी तुम्हाला विनंती आहे, मी माझ्या एकुलत्या एक मुलीला गमावलं आहे. आता आम्हाला जगू द्या, माझ्या मुलीला बदनाम करु नका, आताच कुठे आम्ही पूर्वीप्रमाणे जगत आहोत. पण पुन्हा हे प्रकरण उकरुन काढू नका. आमच्या मुलीवर कोणतेही अत्याचार झाले नाहीत, कृपा करुन हे इथेच थांबवा, आम्ही अनेकदा सांगूनही या राजकारण्यांनी खुप त्रास दिला. पण राजकीय स्वार्थासाठी त्यांनी आमचं जगणही मुश्लिक झालं आहे. ज्यांना आम्ही मतदान करतो, तेच आज आम्हाला बदनाम करत आहेत.

पोलिसांकडे सर्व रेकॉर्ड आहेत. आम्हाला माहित आहे, दिशाच्या बाबतीत कोणतीही चुकीची घटना घडली नाही, पण राजकीय नेत्यांनी केलेल्या बदनामीमुळे आम्ही व्यतिथ झालो आहोत. असे स्पष्टीकरण दिशाच्या आईने यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com