'हा विनयभंग असेल तर सत्तार, पाटील, भिडे यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत?'

Sushma Andhare | संजय राठोड हा विषय संपलाय, असं म्हणणं हा सत्संग आहे का, याचं उत्तर एकदा भाजपने दिलं पाहिजे.
Sushma Andhare |
Sushma Andhare |

Sushma Andhare मुंबई : ताई बाजूला व्हा हा विनयभंग असेल तर सत्तार आणि गुलाबराव पाटील, संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) विनयभंगाच्या आरोपामुळे अडचणीत आले आहेत. यावर आज न्यायालयात सुनावणीही पार पडली, दुपारी दोन वाजता या प्रकरणावर न्यायालय निर्णय देणार आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनीही या वादात उडी घेतली आहे.

Sushma Andhare |
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का; आमदार खासदारांच्या बाबतीतला SC चा धक्कादायक अहवाल समोर

जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देणं ही नौटंकी आहे, असा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, जर भाजपला ही नौटंकी वाटत असेल तर संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी रान पेटवणं, आणि आता आपल्यासाठी संजय राठोड हा विषय संपलाय, असं म्हणणं हा सत्संग आहे का, याचं उत्तर एकदा भाजपने दिलं पाहिजे. तुम्ही नौटंकींचीही व्याख्या ठरवली पाहिजे, तुम्ही काय करताय तेही एकदा ठरवा, जर, ताई बाजूला व्हा असं म्हणणं हा विनयभंग असेल तर अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संभाजी भिडे यांच्यावर का गुन्हे दाखल झाले नाहीत, याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तरे देतील का, असाही सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. म्हणजे देवेंद्र भाऊंनी द्वेषमुलक राजकारण संपले पाहिजे ही नौटंकी नाही का, याचाही विचार करायला पाहिजे.

उद्धव ठाकरे हिंदुत्व आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून लांब गेलेत असं दिपक केसरकर यांचं म्हणणं आहे. असं विचारलं असता. केसरकर स्वत: किती बाळासाहेबांपासून किती लांब गेलेत ते आधी त्यांनीच बघावं. म्हणजे मेरी बिल्ली मुझकोही म्यॉव, असं करण त्यांनी बंद करावं, असं केसरकर यांचं झालं असल्याचा टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.

केसरकर साहेब तुम्ही आता आता शिवसेनेत आलात, तुम्हाला बाळासाहेब कितीदा भेटले आणि तुम्ही आम्हाला सांगायंच? आम्हाला मान्य आहे तुम्ही प्रवक्ते आहात, तुम्ही फार गोड बोलता पण बोलताना तुमच्या डोळ्यातला धुर्तपणा लपत नाही, केसरकर साहेब. बोलताना तुम्ही कोणाबद्दल बोलताय याचं भान बाळगा आणि त्यांनी हिंदुत्त्व सोडले असे तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, हिंदू संस्कृतीत दिवेलागणीनंतर अंत्यसंस्कार होत नाही, मग हाथरसमध्ये एका माय माऊलीवर पोलिसांनीच मध्यरात्री अंत्यसंस्कार करणे हा कोणत्या हिंदुत्त्वाचा भाग होता, हे प्रश्न त्यांनाही विचारायची तयारी ठेवा, अशा शब्दांत अंधारे यांनी केसरकरांनाही सुनावलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com