सर्वपक्षीय बैठकीला जाण्यास फडणवीसांचा नकार; म्हणाले, मुख्यमंत्रीच नसतील तर...

Devendra Fadanvis| Uddhav Thackeray | BJP| असं असेल तर समजूतीने वागण्यापेक्षा आम्ही संघर्षाने वागलेलं बरं
सर्वपक्षीय बैठकीला जाण्यास फडणवीसांचा नकार; म्हणाले, मुख्यमंत्रीच नसतील तर...
Devendra Fadanvis|

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना घडत आहेत त्या पाहता भाजपने (BJP) या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. संवादासाठी राज्य सरकारने जागाच ठेवली नाही. राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा जणू कटच सुरु आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. असं असेल तर समजूतीने वागण्यापेक्षा आम्ही संघर्षाने वागलेलं बरं, असंही म्हटलं आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीला जाण्यास नकार दिला आहे. याचवेळी त्यांनी, बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच उपस्थित राहणार नसतील तर ही बैठक म्हणजे नुसता टाईमपास आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

भोंग्याच्या संदर्भात आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने आज (25 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांनी बैठकीला जाण्यास नकार दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Devendra Fadanvis|
'उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी राष्ट्रपती राजवट लावा'

राज्य सरकारकडून हिटलर शाही सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन हे सर्व सुरु आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. मोहित कंबोज यांच्यावर तर मॉब लिचिंगचा प्रयत्न करण्यात आला. भाजपच्या नेत्यांवर खोटे केस दाखल करण्यात आल्या. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करुन भाजप नेत्यांवर धादांत खोट्या केस टाकल्या जात आहेत. मात्र उच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळाला. त्यांच्या खोट्या केसेस न्यायालयात टिकूच शकत नाहीत.

भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. नवनीत राणा यांनी मुख्मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा वाचणार असल्याचे म्हटले होते. हनुमान चालिसा इथे नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हनुमान चालिसा म्हणणे हा राजद्रोह असेल तर आमच्यातील प्रत्येक जण तो करण्यास तयार आहे. भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई सुरुच राहणार आहे. इतकेच नव्हे तर नवनीत राणा यांना तुरुंगात प्यायला पाणी दिले नाही. त्यांना जेलमध्ये हीन अतिशय दर्जाची वागणूक देण्यात आली. असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.