Sushma Andhare News : लोकप्रतिनिधींवर हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? अंधारेंचा फडणवीसांना सवाल

Sushma Andhare on Sandeep Deshpande Attack: या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा संस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Devendra Fadanvis | Sushma Andhare
Devendra Fadanvis | Sushma AndhareSarkarnama

Maharashtra Politics : मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर झाला हल्ला हा निश्चितपणे निंदनीय आहे. लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या कोणत्याही माणसाने या हल्ल्याचा निषेधच करावा, अशी ही घटना आहे. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा संस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीवर झालेला हल्ला असेल वा आता संदिप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला असेल, जर लोकप्रतिनीधी, शिर्षस्थानी असणाऱ्या अशा लोकांवरच हल्ले होत असतील, तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षिततेचे काय? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadanvis | Sushma Andhare
BJP MLA son arrest for bribe : भाजप आमदाराच्या मुलाला ४० लाखांची लाच स्वीकारताना अटक

काल अकोल्यामध्ये शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांमध्येच दिवसाढवळ्या मारामारी झाली. यात संपर्क प्रमुखाने जिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला केला. दिवसाढवळ्या असे हल्ले होत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पकड ढिली होतं आहे का, या हल्ल्यामुळे एकूणच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, याचा विचार झाला पाहिजे, असे सुचक विधानही सुषमा अंधारे यांनी केले आहे.

Devendra Fadanvis | Sushma Andhare
Sushma Andhare News: गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी, बच्चू कडूंना द्यावी संधी !

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. देशपांडे हे नेहमीप्रमाणे सकाळी शिवाजी पार्क येथे फिरण्यास गेले होते. आज ते एकटेच होते. यावेळी तोडाला रुमाल बांधलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. देशपांडे हे समाजमाध्यमांवर नेहमीच टीका करीत असतात, त्यांचा राग मनात ठेवून हा हल्ला झाला असल्याची चर्चा आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा नियोजित हल्ला असल्याचा मनसेने आरोप केला आहे. देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर या हल्ल्या प्रकरणी ठाकरे गटावर मनसे नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in