Bala Nandgaonkar : ''शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरेंकडे असते तर राणे, शिंदे यांच्यासह 40 आमदार फुटून गेले नसते''

Shivsena : ''संजय राऊतांना राज ठाकरेंनी मोठं केलं...''
Bala Nandgaonkar
Bala NandgaonkarSarkarnama

MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुबंई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

नांदगावकर म्हणाले, ''2017 साली मी 'मातोश्री'वर दोन भाऊ एकत्र यावे, यासाठी गेलो होतो. मात्र, यावेळी त्यांनी मलाच शिवसेनेत या, असं सांगितलं. मी दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत होतो''.

''यावेळी मिलिंद नार्वेकर, शेवाळे यांच्यासह अनेक जण होते. पण तुम्हाला छोट्याभावाबाबत आपुलकी नव्हती. संजय राऊतांना राज ठाकरेंनी मोठं केलं. ते त्यांचे कधी झाले नाहीत, तर ते तुमचे काय होणार?'', असा सवाल उद्धव ठाकरेंना त्यांनी केला.

''शिवसेनेतून (ठाकरे गट) नारायण राणे का बाहेर पडले?, राज ठाकरे का बाहेर पडले? असा सवाल करत जर राज ठाकरेंच्या हातात शिवसेना पक्षाची धुरा असती तर नारायण राणे बाहेर पडले नसते''.

''एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते. 40 आमदार बाहेर पडले नसते. शिवसेनेचे खासदारही बाहेर पडले नसते. मात्र, तुम्ही आपल्याच लोकांना संपवण्याचे काम केलं'', असा आरोपही नांदगावकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

''आत्ता तुम्ही लोकांकडे जाऊन मतांचा जोगवा मागत आहात. तुमच्याकडे तुमच्या कर्तृत्त्वावर उभं केलेलं काय आहे''? असा सवालही त्यांनी केला.

''सध्या शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यामुळे 'वेगवान निर्णय आणि गतीमान महाराष्ट्र' आहे. ते अनेक चांगले निर्णय घेतात. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छुतो. तुम्ही मनसे फोडण्याचं पाप कधीही करू नका. तसेच सरकारने'लव्ह जिहाद'वर देखील लवकरच कायदा आणावा'', असं नांदगावकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com