'शिंदे-फडणवीस सरकारला आमची प्रेतंच पाहायची असतील, तर अरबी समुद्रात पाहावी..'

Ravikant Tupkar : शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आला आहे.
Ravikant Tupkar Latest News
Ravikant Tupkar Latest NewsSarkarnama

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आला आहे. पण आता सोयाबीन कापूस उत्पादक ही मस्ती उतरवल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे फडणवीस सरकारविरुद्ध दंड थोपटले आहे.

पोलिसांनी कितीही दबाव टाकला तरी सरकारशी दोन हात करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. सरकार जगूही देत नाही आणि मरुही देत नाही. सरकारला आमची प्रेतंच पाहायची असतील,तर अरबी समुद्रात पाहावी, असा इशाराही तुपकरांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. (Ravikant Tupkar Latest News)

Ravikant Tupkar Latest News
Aurangabad : तुपकरांसह शेतकरी मुंबईच्या दिशेने ; सिल्लोडजवळ शेतात खाल्ली दुपारची भाकर..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मुंबई येथील अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर मुंबईकडे रवाना होण्याअगोदर तुपकरांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. सोयाबीन आणि कापसाला भाव नाही दिला तर, मंत्रालयाच्या खिडकीतून अरबी समुद्रात प्रेतं पडलेली सरकारला दिसतील.त्यानंतर तरी सरकारला जाग येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया तुपकरांनी यावेळी दिली.

Ravikant Tupkar Latest News
Ajit Pawar : बळीराजाला कोर्टात जाण्याची वेळ येऊ देऊ नका ; अजितदादांनी सरकारला खडसावले

तुपकर म्हणाले, राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे निगरगट्ट झालं आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली, तर श्रेय आम्हाला मिळेल म्हणून हे सरकार जाणीवपूर्वक चर्चेला बोलवत नाही.श्रेय आम्हाला देऊ नका,पण सोयाबीनला साडेआठ हजार रुपये आणि कापसाला १२ हजार रुपये भाव द्या.मात्र,या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. सरकार जगूही देत नाही आणि मरुही देत नाही.सरकारला आमची प्रेतंच पाहायची असतील,तर अरबी समुद्रात पाहावी, अशा शब्दात तुपकरांनी सरकारला सुनावले.

दरम्यान, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं असून त्याची भरपाई अद्यापही मिळालेली नाही. मागील एका महिन्यांपासून आंदोलन करत असून,सरकारने त्याची दखल घेतली नाही. तसेच, सोयाबीनचे दर कोसळले असून, उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही, असेही तुपकरांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com