आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोणाला बसणार झटका? सी व्होटर्सचे देशमुख म्हणाले...

Maharashtra politics : इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने ऑगस्ट महिन्यात सर्व्हे कोला होता
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News Sarkarnama

Maharashtra politics : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागीतल तीन वर्षात मोठ्या प्रणाणात घडमोडी घडल्या आहेत. शिवसेनेत (Shiv Sena) फुट पडून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज निवडणुका झाल्या तर काय होईल, हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. त्या संदर्भातील उत्तर इंडिया टुडे आणि सी व्होटर्ससच्या सर्व्हेमध्ये देण्यात आले आहे.

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने ऑगस्ट महिन्यात एक सर्व्हे कोला होता. त्यानुसार लोकसभा निवडणूक आज झाली तर धक्कादायक चित्र हे एनडीएसाठी असेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक आज झाली तर भाजपसाठी (BJP) महाराष्ट्रात धक्कादायक चित्र असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; 1 हजार 166 गावांमध्ये राजकीय रणधुमाळी

सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुका आज झाल्या तर नरेंद्र मोदीच (Narendra Modi) हे देशाचे पंतप्रधान होतील. लोकसभेला NDA ला २८६ च्या जवळपास जागा मिळतील. तर UPA ला १४६ जागा मिळतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रासाठीचे धक्कादायक निकाल या सर्व्हेत मांडण्यात आले आहेत. लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रात NDA ला ४८ पैकी अवघ्या १८ जागा मिळतील. UPA ला मात्र, ३० जागा मिळतील. अशा अंदाज सर्व्हेमध्ये काढण्यात आला आहे.

या सर्व्हे संदर्भात माध्यमांशी बोलताना यशवंत देशमुख यांनी सांगितले की, जो डेटा आम्ही काढला त्यामध्ये आश्चर्य आम्हाला फारसे वाटण्यासारखे काही नव्हते. आमच्या सर्व्हेमध्ये जे निष्कर्ष काढले होते ते रोज लोकांशी बोलून काढले होते. ज्यावेळी हा सर्व्हे समोर आणला त्यावेळी महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये फुट पडली. त्यानंतर खरी शिवसेना कुणाची? हा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. दुसरीकडे जेव्हा नवे सरकार राज्यात स्थापन झाले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटले होते मात्र तसे झाले नाही. तसेच बिहारमध्येही नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडली. या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे तयार झाला होता.

२०१९ ला भाजप शिवसेनेची युती होती. मात्र, विधानसभेच्या वेळी या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार यावरून वाद झाला. त्यामुळे युती तुटली. मात्र, महाराष्ट्राच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची आपली स्वत:ची एक व्होट बँक आहे. या पक्षांना मतदान करणारा वर्ग आहे.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्यांची मत कोणासोबत जाणार आहे. म्हणजे ते शिंदे यांच्या सोबरत जातील की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहतील. या संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले, यात परत दोन प्रकार पडतात. मुंबईतली शिवसेना हा एक वेगळा पक्ष म्हणून मतदार त्याकडे पाहतात. मुंबईबाहेरची शिवसेना या कडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टीकोन वेगळा आहे. आमच्या सर्व्हेतूनही हीच बाब समोर आली. युतीचे जे मतदार होते त्यातले मुंबई बाहेरचे जे मतदार आहे त्यांची मते भाजपच्या बाजूने कदाचित वळू शकतात, असेही त्यांनी सांगितले. कारण ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार मते देणार नाहीत.

Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
सातारा पालिकेत ५० जागा जिंकणार; मिशीला पीळ, ताव मारून होत नसतं... उदयनराजे

मुंबईत मात्र, शिवसेना ही ठाकरे कुटुंबाशी संबंधित म्हणून पाहिली जाते. त्यामुळे मुंबईबाहेरचा मतदार व मुंबईतला मतदार यांच्यात फरक दिसतो. शिवसेनेतली बहुतांश मते मुंबई बाहेर शिंदे गटासोबत जातील तर मुंबईत ही मते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाऊ शकतात, असा निष्कर्ष या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in